बातम्या

शिंक आरोग्यास फारच उपयुक्त

Sneezing is very useful for health


By nisha patil - 9/7/2024 7:21:04 AM
Share This News:



न सांगता येणारी न थांबवता येणारी शिंक, ही आरोग्यास फारच उपयुक्त आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे.

१) शिंकेमुळे ह्रदयाकडून मेंदुकडे व पोटाकडे अचानक जोराचा दाब दिला जातो, या दाबामुळे सर्वांगातील रक्तदाब जोराने झटका देऊन पुढे ढकलला जातो. याचा चांगला परिणाम रक्त प्रवाहावर होऊन रक्त वाहिन्या चांगल्या प्रकारे कार्यान्वित होतात व डोके हलके होते.
२) पुर्वी लोक शिंका येण्यासाठी नाकात तपकीर ओढून कृत्रिम प्रकारे शिंका आणत होते व डोके हलके करत होते.
३) आता शिंक येणे चुकीचे समजून लोक 'साॅरी' म्हणतात पण ती मात्र नैसर्गिक क्रीया आहे.
४) दैनंदीन जीवनात ह्रदयविकाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कमी आहे, कारण स्त्रिया स्वयंपाक करते वेळी किंवा घराची साफ सफाई करते वेळी, शिंकण्याचे कार्य सतत करत असतात. मात्र ज्या स्रियांचे शिंकण्याचे प्रमाण कमी आहे, त्यांची तब्येत अकारण स्थूल होते. शिंकेमुळे पोटावर प्रचंड दाब येतो व पोटाचे स्नायू आकुंचित केले जातात व त्यामुळे कपालभातीचा योग पूर्ण होतो.
५) नित्य नियमाने सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना या दोन वेळेस शिंक येण्यासाठी उपाय केले तर शरीर सतत निरोगी तर राहतेच, शिवाय पोटाचे व डोक्याचे दुखणे कायमचे बंद होते.
६) कृत्रिम शिंका येण्यासाठी नाकात स्वच्छ धागा फिरवला तर शिंका सहज येतात, ह्यासाठी तपकीर वापरण्याची गरज नाही.
७) शिंकेमुळे नाक व घसा सतत स्वच्छ राहतो, तसेच मनातील ताणतणाव कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्रदयविकार होऊ नये ह्यावर देखील हा रामबाण उपाय आहे. निसर्ग उपचार पद्धती मध्ये ही क्रिया दिलेली आहे.
८) अभ्यास करतांना झोप येत असेल तरीही शिंका काढल्यास पुढील दोन तास डोके तरतरीत राहते व झोप येणे थांबते.


शिंक आरोग्यास फारच उपयुक्त