बातम्या
कोल्हापुरातील वाहतूक समस्येवर तोडगा – ६२४ कोटींच्या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता
By nisha patil - 2/18/2025 8:27:13 AM
Share This News:
कोल्हापुरातील वाहतूक समस्येवर तोडगा – ६२४ कोटींच्या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता
कोल्हापूर, १७ फेब्रुवारी: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास कामांचा आढावा घेतला. शहरातील वाहतूक समस्येच्या सोडवणुकीसाठी फ्लायओव्हर व बास्केट ब्रिजसह ६२४ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे.
.%5B2%5D.jpg)
प्रमुख निर्णय:
- शिवाजी पूल ते तावडे हॉटेल (६.८ किमी) उड्डाणपुलासाठी मंजुरी
- यावळुज ते शिवाजी पूल (१०.८ किमी) रस्त्याचे रुंदीकरण व पुरस्थितीवर उपाय
- गगनबावडा-रत्नागिरी मार्गावर २ किमी जोड रस्ता प्रस्तावित
- सातारा-कागल रस्ता डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण करणार
- आंबा-पैजारवाडी व पैजारवाडी-चोकाक मार्ग एप्रिल २०२६ अखेर पूर्ण होणार
.%5B3%5D.jpg)
बैठकीत खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांसह विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गडहिंग्लज व आजरा शहरासाठी रिंगरोडच्या मागणीवरही लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापुरातील वाहतूक समस्येवर तोडगा – ६२४ कोटींच्या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता
|