बातम्या
चिकनगुनियासाठी काही घरगुती उपाय.
By nisha patil - 10/25/2024 6:06:54 AM
Share This News:
लसूण
चिकुनगुनियाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लसणाचाही वापर करू शकता. यासाठी तुम्ही लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घ्या आणि त्याची साल काढून बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा.
चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि त्याची लक्षणं डेंग्यूसारखीच असतात. एडिस प्रजातीच्या डासांच्या चावण्यामुळे होतो. चिकुनगुनियामुळे हात-पायांवर पुरळ उठणे, सांधेदुखी, अशक्तपणा जाणवणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थकवा आणि ताप यासारख्या समस्यांना उद्भवतात. अनेकवेळा लोकांना काही कारणास्तव दवाखान्यात जाता येत नाही.
पपईची पाने चिकुनगुनिया झाल्यास पपईच्या पानांचा वापर करू शकता. यासाठी सात ते आठ पानं घेऊन ती नीट धुवावीत. नंतर ती बारीक करून त्यांची पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट पिळून त्याचा रस काढा. आता दर तीन तासांच्या अंतराने हा रस दोन चमचे रस घ्या. लसूण चिकुनगुनियाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लसणाचाही वापर करू शकता. यासाठी तुम्ही लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घ्या आणि त्याची साल काढून बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट सांध्यावरील दुखणाऱ्या भागावर लावा. गुळवेल गुळवेल इतर अनेक आजारांसह चिकुनगुनियापासूनही आराम देण्यास उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही गुळवेलचा एक ग्रॅम रस किंवा एक गुळवेल कॅप्सूल घेऊ शकता.
चिकनगुनियासाठी काही घरगुती उपाय.
|