बातम्या
मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी!
By nisha patil - 3/27/2025 4:37:23 PM
Share This News:
मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी!
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ‘गाढवाचं लग्न’पासून सुरू झालेल्या तिच्या प्रवासात ‘नटरंग’, ‘मितवा’, ‘हिरकणी’ यांसारखे सुपरहिट चित्रपट समाविष्ट आहेत. मराठीसोबतच तिने ‘ग्रॅण्ड मस्ती’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ या हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे.
लष्करी कुटुंबात जन्मलेल्या सोनालीने पुण्यात शिक्षण घेतले. अभिनेत्री होण्यापूर्वी ती पत्रकार होती आणि तिने रेडिओ, टेलिव्हिजन व फिल्म प्रॉडक्शनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. आपल्या वेगवेगळ्या लुक्ससाठीही ती चर्चेत असते. तिने तिच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून आता 'Sonalee' असे लिहायला सुरुवात केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी!
|