बातम्या
भाजपच्या भगव्या रंगोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
By nisha patil - 3/20/2025 7:50:37 PM
Share This News:
भाजपच्या भगव्या रंगोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
अंबाई टॅंक येथे महिलांसाठी रंग आणि खेळांचे आयोजन
रंगपंचमीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे अंबाई टँक येथे भव्य भगवा रंगोत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, या सोहळ्याचा महिलांसाठी आगळावेगळा रंगोत्सव ठरला. मोबाईल ग्रुपच्या वतीने महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सचिव मा. महेश बाळासाहेब जाधव यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते पृथ्वीराज महाडिक, अमोल पालोजी, भगवान पाटील तसेच मोबाईल ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपच्या भगव्या रंगोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
|