बातम्या
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा राज्यस्तरीय सन्मान
By nisha patil - 3/25/2025 7:41:43 PM
Share This News:
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा राज्यस्तरीय सन्मान
कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. सुदर्शन सुतार (अधिष्ठाता, सीडी-सीआर) आणि प्रा. मकरंद काईंगडे (टीपीओ) यांना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेकडून सन्मानित करण्यात आले.
प्रा. सुतार यांना "लीडरशिप अवार्ड", तर प्रा. काईंगडे यांना "यंग अचीव्हर अवार्ड" प्रदान करण्यात आला. लोणावळ्यात झालेल्या एमए-टीपीओ डेव्हलपमेंट प्रोग्राम २०२५ दरम्यान, विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी दोघांचे अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा राज्यस्तरीय सन्मान
|