बातम्या
वनवासी आणि शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात यशवंत क्रांती संघटनेचे निवेदन
By nisha patil - 3/17/2025 4:42:17 PM
Share This News:
वनवासी आणि शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात यशवंत क्रांती संघटनेचे निवेदन
वन विभागाच्या मनमानी कारभाराच्या चौकशीची मागणी
कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या अन्यायकारक निर्णयांविरोधात यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. वनहक्क कायद्यानुसार जमीन मिळालेल्या वनवासी नागरिकांना नुकसान भरपाई नाकारण्याचा निर्णय, मृत जनावरांसाठी लादलेले कठोर नियम, तसेच वनविभागाच्या मनमानी आदेशांविरोधात संघटनेने आवाज उठवला आहे.
संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी वनविभागाच्या कारभाराची चौकशी करून पीडित शेतकरी व पशुपालकांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रतिनिधी विक्रम केंजळेकर तारा न्यूज... कोल्हापूर
वनवासी आणि शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात यशवंत क्रांती संघटनेचे निवेदन
|