बातम्या

गुडघ्यांचा ताठरपणा आणि सुजेचे गांभीर्य

Stiffness of the knees and severity of swelling


By nisha patil - 6/19/2024 6:25:29 AM
Share This News:



गुडघे ताठर होण्याची अनेक कारणे असू शकतात. गुडघ्यांच्या सांध्याला धक्‍का बसल्यानेसुद्धा गुडघे ताठर होऊ शकतात. पायाला झालेली इजा म्हणजेच गुडघ्यात लचक भरणे, फ्रॅक्चर किंवा गुडघ्याच्या वाटीवरील आवरणाला छेद जाणे ही गुडघे ताठर होण्यामागची कारणे आहेत. अँटिरिअर कुशिएट लिगामेंटमध्ये (एसीएल) लचक भरणे किंवा फाटणे हे गुडघेदुखीमागचे एक महत्त्वाचे कारण आहे.

आजच्या काळात मला वेळ नाही, हे वाक्य अगदी सर्रास ऐकू येते. आपल्याकडे सोशल मीडियासाठी वेळ आहे, सोशल मीडियावरचे आपले स्टेटस अपडेट करायला वेळ आहे, लाईक्स तपासायला, सेल्फी अपलोड करायला, ऑनलाईन मेसेंजरवर चॅट करायला वेळ आहे आणि तरी आपण म्हणतो, माझ्याकडे वेळच नाहीये. या सगळ्यापेक्षा अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आरोग्य हा त्यापैकीच एक घटक आहे आणि आपण आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असतो. आपल्याकडे असे अनेक रुग्ण येतात, ज्यांचे गुडघे सुजलेले असतात किंवा ताठर झालेले असतात. त्यांच्यावर आधीच उपचार केले असते, तर कदाचित त्यांच्यावर ती परिस्थिती ओढवली नसती.

लवकर न येण्याचे कारण विचारले असता, त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि त्यांना आर्थिक नुकसानाची भीती वाटत होती ही कारणे देण्यात आली.

वेळेवर उपचार करणे गरजेचे.
गुडघे ताठर होण्याचा अनुभव कोणत्याही वयातील आणि कोणत्याही लिंगाच्या व्यक्‍तीला येतो आणि सुरुवातीच्या काळातच त्यावर उपचार करण्यात यावेत. कारण, त्यामुळे तुमच्या दैनंदिन क्रियांवर परिणाम होतो. ज्यांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे किंवा जे स्थूल आहेत त्यांना गुडघ्याची दुखणी होण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या अतिरिक्‍त वजनाच्या दर एक किलोमागे तुम्ही चालताना, धावताना किंवा जिने चढताना तुमच्या गुडघ्यावर अतिरिक्‍त दाब पडत असतो.

गुडघे ताठर असल्याने उद्भवणारी परिस्थिती.
जेव्हा गुडघे ताठर होतात, तेव्हा आपल्याला गुडघ्यांच्या सांध्यांची हालचाल करणे कठीण जाते, त्यामुळे आपल्या संपूर्ण पायाचा लवचीकपणा, ताकद आणि स्थिरतेवर परिणाम होतो. गुडघे ताठर होण्यासाठी अनेक कारणे असतात आणि गुडघ्याचा कोणता भाग ताठर झाला आहे (पुढचा की मागचा) आणि वेदना कुठे होत आहेत, यावर गुडघ्यांवरील उपचार अवलंबून असतात. त्याचप्रमाणे एखादा खेळ खेळताना किंवा तत्सम कृती करताना किंवा अन्य काही कारणांमुळे हे घडले आहे का, ते तपासून घ्यावे लागते.

गुडघे ताठर होण्याची कारणे.
गुडघे ताठर होण्याची अनेक कारणे असू शकतात. गुडघ्यांच्या सांध्याला धक्‍का बसल्यानेसुद्धा गुडघे ताठर होऊ शकतात. पायाला झालेली इजा म्हणजेच गुडघ्यात लचक भरणे, फ्रॅक्चर किंवा गुडघ्याच्या वाटीवरील आवरणाला छेद जाणे ही गुडघे ताठर होण्यामागची कारणे आहेत. अँटिरिअर कुशिएट लिगामेंटमध्ये (एसीएल) लचक भरणे किंवा फाटणे हे गुडघेदुखीमागचे एक महत्त्वाचे कारण आहे.


गुडघ्यांचा ताठरपणा आणि सुजेचे गांभीर्य