बातम्या
दूध घातलेला चहा पिणं सोडा,
By nisha patil - 5/24/2024 12:11:51 AM
Share This News:
आपल्याकडे बरेच लोक असे आहेत ज्यांना चहा आणि कॉफी पिण्यासाठी फक्त निमित्त लागतं. मग ती दिवसातली कोणतीही वेळ का असेना. जेवणाच्या आधी, जेवणाच्यानंतर, रात्री झोपण्यापुर्वी, सकाळी झोपेतून उठल्यावर असं कोणत्याही वेळी काही लोक अगदी सहज चहा घेऊ शकतात. तुम्हालाही अशीच सवय असेल तर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी दिलेला सल्ला एकदा वाचा.. असा दूध घातलेला चहा किंवा कॉफी कोणत्याही वेळी घेतली तर त्याने तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचा अहवाल त्यांनी नुकताच प्रसिद्ध केला आहे.
आयसीएमआरच्या अभ्यासकांनी चहा- कॉफी पिण्यासंबंधी नुकतीच एक गाईडलाईन प्रसिद्ध केली आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की चहा किंवा कॉफी तुम्ही जास्त प्रमाणात पित असाल तर त्यातून तुमच्या शरीरात खूप जास्त प्रमाणात कॅफिन जातं. कॅफिनमुळे शरीरामध्ये लोह शोषून घेण्यास अडचणी येतात.
यामुळे अनेकांच्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि त्यातूनच ॲनिमियाचा त्रास वाढतो, असा निष्कर्षही त्यांनी काढला आहे. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी तर दूध घातलेला चहा किंवा कॉफी तर घेऊ नयेच पण जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर एक तास आणि जेवणापुर्वी किंवा नाश्त्यापुर्वी एक तास तरी चहा- कॉफीचे सेवन करू नये. कारण त्यामुळे आहारातील लोह रक्तात मिसळण्यास अडचणी येतात.
चहा- कॉफीच्या एका कपात किती कॅफिन असते...?
ICMR ने दिलेल्या अहवालानुसार दिवसातून ३०० मिलीग्रॅम एवढं कॅफीन तुम्ही सेवन करत असाल तर ते ठीक आहे. एक कप कॉफी प्यायल्याने एकावेळी तुमच्या शरीरात ८० ते १२० मिलीग्रॅम कॅफीन जाते. जर ती इंस्टंट कॉफी असेल तर त्यातून ५० ते ६६ मिलीग्रॅम कॅफिन मिळते.
तर तोच जर चहाचा कप असेल तर त्यातून ३० ते ६५ मिलीग्रॅम कॅफीन पोटात जाते. दूध घालून केलेल्या चहा- कॉफीपेक्षा कोरी किंवा बिनादुध चहा- कॉफी घेण्यास प्राधान्य द्यावे. कारण त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि धमनयांशि संबंधितआजारांचा धोका कमी होतो, अशी सूचनाही ICMR ने केली आहे.
दूध घातलेला चहा पिणं सोडा,
|