बातम्या
कोल्हापुरात STP प्रकल्पाला तीव्र विरोध – नागरिक आणि नेत्यांचे प्रशासक आयुक्तांना निवेदन
By nisha patil - 3/21/2025 4:42:37 PM
Share This News:
कोल्हापुरात STP प्रकल्पाला तीव्र विरोध – नागरिक आणि नेत्यांचे प्रशासक आयुक्तांना निवेदन
कोल्हापूर महानगरपालिकेच्या STP (सीवेज ट्रीटमेंट प्लांट) प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येत आज प्रशासक आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी मॅडम यांना निवेदन सादर केले. या प्रकल्पामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, त्यांनी एकमुखाने याला विरोध दर्शवला.
या वेळी माजी उपमहापौर भुपाल शेटे, भाजप जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम, माजी नगरसेवक महेश दादा वासुदेव आणि आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, प्रशांत गायकवाड, उदयसिंह शेजाळे, शफिक मुल्ला यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रकल्पाचा सर्वाधिक परिणाम अरिहंत पार्क, वृंदावन पार्क, वर्षानगर, म्हाडा कॉलनी, संभाजी हौसिंग सोसायटी, लाईफस्टाईल अपार्टमेंट, वसंत लहर अपार्टमेंट, वेदांत रेसिडेन्सी, गोल्डन शेल्टर अपार्टमेंट, मनिषा नगर आणि बडे लकी अपार्टमेंट या भागांवर होणार असल्याने या ठिकाणांतील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने एकत्र येत विरोध दर्शवण्यासाठी उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला की, हा प्रकल्प रद्द न केल्यास पुढे मोठे आंदोलन उभारले जाईल.
कोल्हापुरात STP प्रकल्पाला तीव्र विरोध – नागरिक आणि नेत्यांचे प्रशासक आयुक्तांना निवेदन
|