बातम्या
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बाळगून यश संपादन करावे – डॉ. वेदप्रकाश मिश्रा
By nisha patil - 3/19/2025 10:06:25 PM
Share This News:
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बाळगून यश संपादन करावे – डॉ. वेदप्रकाश मिश्रा
डी. वाय. पाटील विद्यापीठाचा 13 वा दीक्षांत समारंभ उत्साहात पार
"शिक्षण कधीही संपत नाही. मोठी स्वप्ने बाळगा, परिश्रम घ्या आणि आपली स्वाक्षरी 'ऑटोग्राफ' बनेल इतके यश मिळवा," असे प्रेरणादायी विचार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी मांडले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 13व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
समारंभात एकूण 690 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच 19 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, तर डॉ. रणजित निकम यांना संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले. डॉ. सागर गोयल यांना 'बेस्ट आउटगोइंग स्टुडंट' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बाळगून यश संपादन करावे – डॉ. वेदप्रकाश मिश्रा
|