बातम्या
समर्पित बँक कर्मचारी ते उत्कृष्ठ कलाकार - सुमन वसंत बेंद्रे
By nisha patil - 12/3/2025 6:21:22 PM
Share This News:
समर्पित बँक कर्मचारी ते उत्कृष्ठ कलाकार - सुमन वसंत बेंद्रे
सुमन वसंत बित्रे यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात एप्रिल 1981 मध्ये देना बँकेत कॅशियर म्हणून केली. आपल्या कार्यकाळात त्यांनी उत्कृष्ट ग्राहक सेवा, उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि ग्राहकांना त्यांच्या गरजांमध्ये मदत करण्यावर भर दिला.
त्यांच्या मेहनती, प्रामाणिकपणामुळे आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची सतत प्रगती होत गेली.ऑगस्ट 2017 मध्ये स्केल I अधिकारी या पदावरून त्या यशस्वीरीत्या सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीनंतर, सुमन बित्रे यांनी आपल्या आवडीनुसार सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षांपासून त्या सरगम म्युझिकल ग्रुप अँड अॅक्टाइन या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून त्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत असून, आपल्या गायन आणि अभिनय कौशल्याने रसिक प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत.
समर्पित बँक कर्मचारी ते उत्कृष्ठ कलाकार - सुमन वसंत बेंद्रे
|