बातम्या
आला उन्हाळा ......
By nisha patil - 12/4/2024 8:59:49 AM
Share This News:
चैत्राची पालखी, वसंताचे आगमन , गाणारी कोकिळा, फुललेला निसर्ग या सगळ्या गोष्टी रणरणत्या उन्हाच्या पुढे खोट्या वाटू लागतात. सतत जिवाची घालमेल करत राहणारा हा वैशाख वणवा.
कमी झालेली भूक, मंदावलेली पचनशक्ती, कांजण्या- गोवर या सारख्या साथींचा वाढलेला प्रादुर्भाव, डोळे येणे, नाकातून रक्त येणे, चक्कर येणे, हात- पाय यांच्या तळव्याची आग होणे या तक्रारी डोके वर काढून त्रास देत असताना हा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आहाराच्या आयुर्वेदिक
या काळामध्ये सकाळी उपाशीपोटी कामावरती बाहेर पडणे जरा टाळावे.
अंगात सुती कपडे , फिकट रंगाचे स्वच्छ कपडे घालावेत.
सिंथेटिक, काळे कपडे कटाक्षाने टाळावेत.
सकाळी उपाशीपोटी २-३ भिजवलेले अंजीर+ १०-१२ भिजवलेले काळे मनुके खाणे उपयुक्त.
या काळात काजू,बदाम,अंडी, भिजवलेले शेंगदाणे यांचे सेवन नको.
नाश्त्यासाठी गुळ तूप पोळीचा रोल, तूप साखर पोळी, लोणी साखर पोळी ,मुगाच्या डाळीची खिचडी , मेतकूट भात , भाजणीचे थालीपीठ, पुलाव भाज्या घालून केलेले पराठे, ज्वारी- नाचणी- तांदूळ यांची भाकरी सोबत पुदिन्याची चटणी यापैकी काहीही चालू शकेल.
याच जोडीला या दिवसांमध्ये सकाळी नाष्ट्यासाठी तूप - जिरे - सुंठ घालून केलेली भाताची पेज, नाचणीची पेज, ज्वारीचे आंबील,सातूचे पीठ हे पर्याय सुद्धा खूप मदतीचे ठरतात.
जिरे, हिंग ,कढीपत्ता, तूप यांची फोडणी देऊन केलेला दहीभात सुद्धा या दिवसासाठी नाश्त्याचा उत्तम पर्याय ठरतो.
दुपारच्या जेवणात ओले नारळ, कोथिंबीर, आलं ,पुदिन्याची चटणी, काकडी/ टोमॅटो/ बीट /गाजर /कांदा यापैकी एखादी कोशिंबीर, नेहमी मिळणारे हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि पोळी, वरण भात असाच आहार ठेवावा. जेवणानंतर आवर्जून धने जिऱ्याची पावडर घालून केलेले ताक घ्यावे. दुपारच्या जेवणामध्ये या काळात लिंबू आवश्य ठेवावे.
स्वयंपाक करताना मुगाची डाळ, तूर डाळ ,मसूर, यांचा वापर असावा. मटकी, लाल चवळी यांचा सुद्धा वापर चालेल . मात्र छोले ,राजमा, पावटा यांचा वापर जपून करावा.
हिरव्या मिरची पेक्षा लाल तिखटाचा वापर या काळामध्ये करावा.
त्याच जोडीला स्वयंपाक करत असताना धने ,जिरे,आमसूल, कोथिंबीर यांचा प्रमाण वाढवत नेलं तर उष्णतेचे त्रास लवकरच आवाक्यात येतात.
संध्याकाळच्या नाश्त्याचा विचार करताना दुपारी चारच्या आसपास खाण्यासाठी या काळामध्ये उपलब्ध असणारी मुबलक फळ ही सुद्धा एक समर्थ पर्याय म्हणून उभे राहू शकतात .
या फळांमध्ये आंबा,टरबूज, खरबूज ,करवंद ,द्राक्ष, मोसंबी, संत्री ,सिताफळ, काकडी, ओले नारळ, वेलची केळी , अंजीर, कोहळा यांचा मुबलक प्रमाणामध्ये वापर हा फायद्याचा ठरतो.
वारंवार हिमोग्लोबिन कमी असण्याची तक्रार असणाऱ्यांसाठी करवंद हे फळ जादू सारखे काम नक्कीच करून जाते.
रात्रीचे जेवण हे पचायला हलकं असं असावं. शक्यतो एखादी फळभाजी व ज्वारी /नाचणी किंवा तांदूळ यांची भाकरी किंवा भाज्या घालून केलेली खिचडी कढी घ्यावी .
शक्य असल्यास दोन्ही जेवणा मध्ये घरी बनवलेल्या तुपाचा समावेश आवर्जून करावा
या काळामध्ये भूक वाढवण्यासाठी कैरीचं लोणचं , कैरीचा तक्कू, करवंदाचे लोणचं, छोट्या- छोट्या पांढऱ्या कांद्यांचं लोणचं, कैरी-मेथीचे दाणे- गूळ घालून केलेला कायरस, आमसुलाचे सार, टोमॅटो सार मदत करतात.
👉 भाज्यांमध्ये चाकवत, चुका ,पडवळ ,भेंडी, बीट, बटाटा, सुरण, कोबी, तोंडली, अळू , घोसाळे, पांढऱ्या कांदा या भाज्या पचायला सोप्या जातात. तर कडधान्य उसळी,शेवगा,वांगी, कारले,मेथी, गवार जराश्या त्रासदायक ठरतात .
👉 एकूणच वातावरणातील उष्णता प्रचंड वाढलेली असल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते ,त्यामुळे हा ऋतूमध्ये warter management ही गोष्ट सुद्धा तितकेच महत्त्वाची ठरते. यासाठी संध्याकाळी ground नंतर वाळा /मोगरा घालून सुगंधित केलेलं माठातलं पाणी, नारळाचं पाणी, ताक, कोकम/ आवळा /करवंद यांचे सरबत, लिंबू/ गुलाब/ वाळा यांचे सरबत, कैरीचा पन्हे, बर्फ न घालता केलेला उसाचा रस, दुधाचा मसाला घालून केलेले थंड दूध ,गुलकंद आणि दूध यांचा वापर फायद्याचा ठरतो.
आला उन्हाळा ......
|