बातम्या

सूर्यफूल की शेंगदाणा तेल? उत्तम आरोग्यासाठी कोणते तेल बेस्ट आणि का?

Sunflower or peanut oil


By nisha patil - 3/8/2024 8:18:53 AM
Share This News:



भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आहे. प्रत्येकाची अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आंबट, गोड, तिखट, चमचमीत अशा नानाविध चवींचे पदार्थ केले जातात. त्यातही तळलेले पदार्थ सर्वांच्या विशेष आवडीचे असतात. फोडणी असो किंवा तळण्यासाठी, रोजच्या जेवणाच्या वापरात तेल असतेच. पण सध्या बाजारात भेसळयुक्त पदार्थांचा सुळसुळाट सुरु आहे.

तांदुळापासून ते तेलापर्यंत प्रत्येक गोष्टीत भेसळ सुरु आहे. तेलामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. महाराष्ट्रात बहुतांश घरात आपण पाहिलं असेल की, गृहिणी शेंगदाणा तेल किंवा सूर्यफुलाच्या बियांपासून तयार तेल वापरते.

दोघांपैकी आरोग्यासाठी कोणते तेल योग्य...?
यासंदर्भात पोषणतज्ज्ञ स्वपान बॅनर्जी सांगतात, ' प्रत्येक तेलाचे आपआपले फायदे आहेत. सूर्यफूल तेल हे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सचा समृद्ध स्रोत आहे, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. शिवाय बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी करते. दुसरीकडे, शेंगदाणा तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे हृदयविकारांपासून रक्षण करते.

ते पुढे म्हणतात, 'सूर्यफूल तेलामध्ये व्हिटॅमिन ई, बी१ , मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, जस्त, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज आणि फोलेट यांसारखे विविध पोषक घटक असतात. शेंगदाणा तेलामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन ई, बी६, कॅल्शियम आणि जस्त आढळते. ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही तेल फायदेशीर ठरते.'

सूर्यफूल तेल हृदयरोग, दमा आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करतात. शेंगदाणा तेलाचे नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढणे, खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे, कर्करोग, लठ्ठपणा, हृदयविकार, नैराश्य यासह इतर गंभीर आजारांपासून सरंक्षण करते. शिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवून आरोग्य सुदृढ ठेवते.

आपण दोन्ही तेलाचा आहारात समावेश करू शकता. पण कोणतेही तेल अतिप्रमाणात खाऊ नये. जर आपण विशिष्ट आजाराने  ग्रास्ले असाल तर, तेलाची निवड करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.


सूर्यफूल की शेंगदाणा तेल? उत्तम आरोग्यासाठी कोणते तेल बेस्ट आणि का?
Total Views: 3