बातम्या

नऊ महिन्यांनंतर सुनिता विलियम्स पृथ्वीवर परतणार

Sunita Williams to return to Earth after nine months


By nisha patil - 3/17/2025 4:34:55 PM
Share This News:



नऊ महिन्यांनंतर सुनिता विलियम्स पृथ्वीवर परतणार

नऊ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स मंगळवारी, 18 मार्च रोजी पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांच्यासोबत बुच विल्मोर आणि दोन अन्य अंतराळवीरही या मोहिमेतून पृथ्वीवर परततील.

नासाच्या माहितीनुसार, ही मोहिम पूर्वनियोजित वेळेपेक्षा एक दिवस आधीच पार पडणार आहे. जगभरातील विज्ञानप्रेमी आणि तज्ज्ञांचे या मोहिमेकडे लक्ष असताना, विलियम्स यांना यामधून किती आर्थिक मोबदला मिळेल, हा प्रश्नही चर्चेत आहे.

नासाच्या माजी अंतराळवीर कॅडी कोलमॅन यांच्या माहितीनुसार, अंतराळवीरांना वाढीव तासांच्या कामासाठी कोणताही अतिरिक्त मोबदला मिळत नाही. सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांचा अवकाशातील कामकाळही कार्यालयीन तासांप्रमाणेच गणला जातो. मात्र, त्यांना एक विशेष दैनंदिन भत्ता दिला जातो.

विलियम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही परतीची मोहिम ऐतिहासिक ठरणार असून, तिच्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.


नऊ महिन्यांनंतर सुनिता विलियम्स पृथ्वीवर परतणार
Total Views: 18