बातम्या
हसन मुश्रीफांच्या त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा टोला
By nisha patil - 3/14/2025 4:02:44 PM
Share This News:
हसन मुश्रीफांच्या त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा टोला
जयंत पाटलांच्या मनात नाराजीचा प्रश्नच नाही..
इतका मोठा पक्ष असूनही... काय म्हणाल्या सुप्रिया सुळे पहा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांची भेट घेत तब्बल तासभर चर्चा केली. यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "जयंत पाटलांच्या मनात नाराजीचा प्रश्नच नाही. इतकी मोठी संघटना आणि पक्ष असूनही अजित पवार गटाला आजही जयंत पाटील हवाहवसे वाटतात, हीच मोठी कॉम्प्लिमेंट आहे."त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला फारसा आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जयंत पाटील पक्षासाठी पूर्णपणे कार्यरत असून, त्यांचा पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी सूचित केले.
हसन मुश्रीफांच्या त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा टोला
|