बातम्या

शरीरात झालेले ४ बदल सांगतात डायबिटीसची लक्षणं

Symptoms of diabetes indicate 4 changes in the body


By nisha patil - 4/27/2024 7:51:01 AM
Share This News:



बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह किंवा डायबिटीससारखे आजार कमी वयातच मागे लागत आहेत. अनुवंशिकता हा त्यातला एक मुद्दा असला तरीही खाण्यापिण्यात झालेले बदल, व्यायामाचा अभाव, बैठे काम, लठ्ठपणा या गोष्टीही मधुमेह होण्यासाठी जबाबदार आहेतच.

रक्तातील साखरेची पातळी जेव्हा वाढू लागते, तेव्हा आपले शरीर आपल्याला त्याबाबत सूचना देते. आपल्या शरीरात काही बदल होऊ लागतात. पण ते बदल अगदी क्षुल्लक, साधे वाटतात म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण हे बदल वेळीच ओळखा आणि ते जाणवले तर लगेच मधुमेहाची तपासणी करून घ्या. हे बदल नेमके कोणते याविषयी अमेरिकेचे फार्मासिस्ट ग्राहम फिलिप्स यांनी दिलेली माहिती आजतकने प्रकाशित केली आहे.

*यापैकी सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे जर तुमच्या पोटाचा घेर खूप वाढत चालला असेल तर मधुमेहाची तपासणी करून घ्या.

*जेवण झाल्यानंतरही लगेचच पुन्हा काही वेळातच भूक लागल्यासारखे होत असेल तर ते मधुमेहाचे एक लक्षण असू शकते.

*भूक कंट्राेल करणं शक्य होत नसेल, वेळेवर जेवायला मिळालं नाही, तर चिडचिडेपणा वाढत असेल तर एकदा मधुमेहाची तपासणी करून घ्यावी.

*मान खूप काळी पडली असल्यास तो बदल केवळ अस्वच्छता किंवा बाह्य बदलांमुळे झालेला नसतो. ते देखील मधुमेहाचे एक लक्षण असू शकते.


शरीरात झालेले ४ बदल सांगतात डायबिटीसची लक्षणं