बातम्या
खिद्रापूरजवळ भीषण अपघात: तरुणाचा जागीच मृत्यू
By nisha patil - 3/15/2025 3:17:01 PM
Share This News:
खिद्रापूरजवळ भीषण अपघात: तरुणाचा जागीच मृत्यू
खिद्रापूर-बोरगाव मार्गावर घोसरवाड दत्तवाड कृषी विद्यालयाजवळ रात्रीच्या सुमारास दुचाकी अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव रोहित राजू सावळे (वय 30, रा. खिद्रापूर) असे आहे.
रोहित सावळे हे बोरगावहून खिद्रापूरकडे जात असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकीसह ते खाली कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री अपघात घडल्याने कोणालाही त्याची माहिती मिळाली नाही. मात्र, सकाळी रस्त्यावर पडलेली दुचाकी दिसून आल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना कळवले.
या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे संतोष साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
खिद्रापूरजवळ भीषण अपघात: तरुणाचा जागीच मृत्यू
|