बातम्या
वर्षानगर वृंदावन पार्क येथील STP प्रकल्प स्थानीक नागरीकांचा विरोध लक्षात घेता त्वरीत रद्द करावा - 'आप' ची महापालीकेकडे मागणी.
By nisha patil - 3/18/2025 12:09:59 AM
Share This News:
वर्षानगर वृंदावन पार्क येथील STP प्रकल्प स्थानीक नागरीकांचा विरोध लक्षात घेता त्वरीत रद्द करावा - 'आप' ची महापालीकेकडे मागणी.
वर्षानगर वृंदावन पार्क एसएससी बोर्ड जवळ STP प्लांट च्या प्रकल्पाविरोधात आज आम आदमी पार्टी तर्फे हा प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त मा.राहुल रोकडे व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना निवेदन देण्यात आले.
भाजी मंडईचे आरक्षण असताना STP प्लांट चा घाट महापालीका अधीकारी व काही हस्तकांनी घातला आहे व स्थानीक नागरिकांना विश्वासात न घेता घेतलेले हा निर्णय आहे, स्थानीक नागरिकांचा ह्या प्रकल्पाला तिव्र विरोध आहे व येथील नागरीकांच्या सोयीसाठी भाजी मंडई साठी ओपन स्पेस आरक्षीत असताना STP प्लांट चा घाट घातला जात आहे, हा निर्णय रद्द करावा अन्यथा स्थानीक नागरिकांना घेऊन आम आदमी पार्टी च्या वतीने रस्त्यावर उतरुन मोठं जनआंदोलन उभा करण्याचा इशारा दिला.
यावेळी शहर उपाध्यक्ष सुरज सुर्वे, युवक शहराध्यक्ष मोईन मोकाशी , शहर संघटक दुष्यंत माने, रिक्षा शहराध्यक्ष संजय नलवडे उपस्थित होते.
वर्षानगर वृंदावन पार्क येथील STP प्रकल्प स्थानीक नागरीकांचा विरोध लक्षात घेता त्वरीत रद्द करावा - 'आप' ची महापालीकेकडे मागणी.
|