बातम्या
देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय……
By nisha patil - 3/13/2025 4:39:41 PM
Share This News:
देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय……
जनावरांचे आधार कार्ड ; 'एआय' तंत्रज्ञान 'ब्लॉकचेन'च्या माध्यमातून
शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्या माध्यमातून जनावरांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यास मदत होण्यासाठी केंद्राने देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची जबाबदारीही 'आदानी' कंपनीला दिली आहे. शेतीप्रमाणेच दुग्ध व्यवसायात 'एआय' तंत्रज्ञान 'ब्लॉकचेन'च्या माध्यमातून राबवून दुधातील भेसळ कशा पद्धतीने रोखता येईल, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
'एआय' दुग्धव्यवसायात आणले तर भेसळीला चाप बसेल. पटणा येथील कार्यशाळेत इंडियन डेअरी असोसिएशनचे सदस्य डॉ. चेतन नरके यांनी याबाबतची ब्लू प्रिंट सादर केली. केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री राजीव रजन सिंह यांनी ब्लू प्रिंटचे कौतुक करत अंमलबजावणीबाबत सकारात्मक इच्छा व्यक्त केली. ग्राहकाच्या हातात दूध पिशवी पडल्यानंतर त्यावरील 'क्यूआर कोड'वरून दुधाचे उत्पादन ते वितरणापर्यंतचा प्रवास त्यांना कळणार आहे. त्यामुळे भेसळीला प्रतिबंध येणार आहे.
देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय……
|