बातम्या
पळसवडे येथे विठलाई व काळमादेवी यात्रेचा उत्साह...
By nisha patil - 3/15/2025 3:12:55 PM
Share This News:
पळसवडे येथे विठलाई व काळमादेवी यात्रेचा उत्साह...
आमदार डॉ. विनय कोरे यांनी घेतले दर्शन
पळसवडे (ता. शाहूवाडी): पळसवडे येथे विठलाई देवी व काळमादेवीच्या यात्रेनिमित्त मोठ्या भक्तिभावाने धार्मिक विधी पार पडले. यात्रेच्या निमित्ताने आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी विठलाई व काळमादेवीच्या पालखीचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी विरळे गावचे माजी सरपंच कृष्णा पाटील, माजी सरपंच महादेव इंदुलकर, सरपंच सुरेश पाटील, तसेच मारुती पाटील, प्रकाश पाटील, बाबुराव पाटील, शरद पाटील, सुरेश पाटील, भीमराव पाटील, दीपक तिडके, उमेश पाटील यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेच्या निमित्ताने धार्मिक वातावरण निर्माण झाले होते आणि श्रद्धेचा मोठा उत्साह पहायला मिळाला.
पळसवडे येथे विठलाई व काळमादेवी यात्रेचा उत्साह...
|