बातम्या

प्रवचनातून उलगडणार प्रभू श्रीरामांचा जीवनपट श्रीराम नवमी उत्सवअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

The life story of Lord Shri Ram will be revealed through the sermon


By nisha patil - 3/25/2025 7:47:30 PM
Share This News:



प्रवचनातून उलगडणार प्रभू श्रीरामांचा जीवनपट श्रीराम नवमी उत्सवअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

कागल,प्रतिनिधी. येथे श्रीराम नवमी उत्सव अंतर्गत  अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्रीराम मंदिर देवस्थान जिर्णोद्धार समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संतश्रेष्ठ श्री गोस्वामी तुलसीदासजी महाराजांच्या 'श्रीराम चरित मानस' या  ग्रंथावर आधारित 'रामकथा' या विषयावरील प्रवचनकार कांचनताई धनाले यांची सुश्राव्य प्रवचनातून प्रभू श्रीरामांचा संपूर्ण जीवनपट भक्तांना अनुभवता येणार आहे. 

शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी चार ते पाच या दरम्यान इच्छापूर्ती कलश पूजन होईल.त्यानंतर पाच एप्रिलपर्यंत दररोज सायंकाळी पाच ते सात या दरम्यान धनाले यांचे 'श्रीरामकथा' प्रवचन होईल.यामध्ये श्रीराम कथा आरंभ बालकांड,श्रीराम जन्म, श्रीराम जानकी स्वयंवर,अयोध्या कांड,श्रीराम प्रभूंचे वनगमन, अरण्यकांड,किष्कींधाकांड,सुंदर कांड लंका कांड,उत्तराखंड पारायण समाप्ती असे शुक्रवार तारीख चार एप्रिलपर्यंत सायंकाळी चार ते पाच या दरम्यान पर्यंत प्रवचन होईल.दुपारी तीन ते सायंकाळी पाच या दरम्यान विविध भजनी मंडळांची संगीत हरीभजन सेवा होईल.  तर शनिवार तारीख पाच एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा या दरम्यान पारायण समाप्ती होईल.

सायंकाळी सहा ते सात यादरम्यान भक्ती गीतांवर आधारित भरतनाट्यम कार्यक्रम होईल. रविवारी तारीख सहा एप्रिल  रोजी सकाळी दहा ते बारा यादरम्यान भजन तर दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मकाळ आरती व सुंटवडा प्रसाद वाटप होईल.

येथील खर्डेकर चौकातील प्रभू श्रीराम मंदिरमध्ये या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये श्रीराम भक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने केले आहे.


प्रवचनातून उलगडणार प्रभू श्रीरामांचा जीवनपट श्रीराम नवमी उत्सवअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन
Total Views: 11