बातम्या
विकतच्या प्रोटीन पावडरींनी वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, फक्त १० रूपये खर्च, खा देशी प्रोटीन.....
By nisha patil - 5/27/2024 6:22:53 AM
Share This News:
शरीर निरोगी ठेवण्यासाठी जर तुम्ही प्रोटीन पावडर किंवा प्रोटीनचे डब्बे खात असाल तर आरोग्याशी खेळत आहात. (Health Tips) कारण भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आयसीएमआरने लोकांना मांसपेशी मजबूत बनवण्यासाठी प्रोटीन पावडरचे सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे.
आयसीएमआरने सुचना दिली आहे की हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता आणि किडनी खराब झाल्यामुळे गंभीर स्थिती उद्भवू शकते. बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पाववडरमध्ये शुगर, आर्टिफिशियल, स्वीटनर्स यांसारखे पदार्थ मिसळेल जातात. नियमित या पदार्थांचे सेवन उचित ठरत नाही.
फिटनेस ट्रेनर नितेश सोनी सांगतात की मागच्या काही वर्षात डाएटरी सप्लिमेंट्स बरेच लोकप्रिय झाल्या आहेत. प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी लोक हेल्दी ऑपश्न्स निवडतात. मांसपेशी मजबूत करण्यासाठी तुम्ही प्रोटीन पावडरचे सेवन करू शकता ज्यामुळे शरीर पोकळ होण्यापासून रोखता येते.
देशी प्रोटीन पावडर कशी बनवावी...?
५० ग्राम भाजलेल्या चण्यांतून १३ ते १४ ग्राम प्रोटीन मिळते. याव्यतिरिक्त यातून चांगल्या प्रमाणात फायबर्सही मिळतात. ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त यात मिनरल्स असतात जे तुम्हाला व्हे प्रोटीनमधून मिळत नाही. ५ ते ७ ग्राम देशी गुळ घाला. ज्यामुळे शरीर लोखंडासारखे मजबूत राहते. तुम्ही यात दूध घालूनही पिऊ शकता.
देशी प्रोटीन पावडर कशी तयार करतात...?
मिक्सरमध्ये चण्यांची पावडर बनवून घ्या. एक ग्लास दूधात केळी घाला, २ खजूर घाला, ५ ग्राम गुळ घाला.
एक्सपर्ट्स सांगतात की देशी प्रोटीन पावडरव्यतिरिक्त इतर मिनरल्स आणि व्हिटामीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे शरीराला ताकद मिळते. ते सांगतात हे मिश्रण १५ दिवस घेतल्यानं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. इतकंच नाही तर थकवा, कमकुवतपणा, गुडघेदुखीच्या वेदना कमी होण्यासही मदत होते.
आयसीएमआरने लोकांना सल्ला देत सांगितले की मांसपेशींना मजबूत बनवण्यासाठी प्रोटीन पावडर घेण्याऐवजी नैसर्गिक स्त्रोतयुक्त चांगली गुणवत्ता असलेल्या प्रोटीन्सचा आहारात समावेश करा. ज्यातून तुम्हाला भरपूर अमिनो एसिड्स मिळतील. आयसीएमआरच्या रिपोर्टनुसार जास्त प्रमाणात प्रोटीन पावडर घेणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतकं. हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता आणि किडनी खराब होण्याचा धोका उद्भवू शकतो.
प्रोटीनसाठी काय खावे...
आयसीएमआरच्या रिपोर्टनुसार संतुलित आहाराने रोजची प्रोटीनची कमतरता भरून काढता येऊ शकते. तज्ज्ञ सांगतात की रोजची प्रोटीन्सची गरज पूर्ण करण्यासाठी ३० ग्राम डाळींचे आणि नॅच्युरल प्रोटीन्सचे सेवन करा. ज्यामुळे शरीराला अधिकाधिक फायदे मिळतील.
विकतच्या प्रोटीन पावडरींनी वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, फक्त १० रूपये खर्च, खा देशी प्रोटीन.....
|