बातम्या
सतेज फुटबॉल चषकावर पाटाकडील तालीम मंडळाने उमटवली मोहोर….
By nisha patil - 3/15/2025 3:08:34 PM
Share This News:
सतेज फुटबॉल चषकावर पाटाकडील तालीम मंडळाने उमटवली मोहोर….
डी.वाय. पाटील ग्रुप आणि पाटाकडील तालीम मंडळ आयोजित कै. पांडबा जाधव आणि कै. रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक 2025 स्पर्धेत आज खंडोबा तालीम विरुद्ध पीटीएम यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पीटीएमने खंडोबावर 4-2 गोल फरकाने विजय मिळवून सतेज चषक उंचावला तर खंडोबा तालीम संघाला उपविजेतेपद मिळाले. याबद्दल दोन्ही संघाचं अभिनंदन आ.सतेज पाटील यांनी केले आहे.
यावेळी वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, भारतीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक मंदार ताम्हणे, डॉ. भरत कोटकर, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह महेश उत्तुरे, यांच्यासह पीटीएम आणि केएसएचे पदाधिकारी आणि फुटबॉल शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतेज फुटबॉल चषकावर पाटाकडील तालीम मंडळाने उमटवली मोहोर….
|