बातम्या

लांडगा आला रे आला गोष्ट

The wolf has come


By nisha patil - 8/31/2024 9:51:57 AM
Share This News:



अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक मेंढपाळ राहत होता. त्याच्याजवळ अनेक मेंढ्या होत्या. ज्यांना चारण्यासाठी तो जंगलात जायचा. प्रत्येक सकाळी तो मेंढ्या घेऊन यायचा आणि संध्याकाळी परत यायचा. दिवसभर मेंढ्या चारा खायच्या व हा मेंढपाळ मुलगा कंटाळून जायचा. स्वतःचे मनोरंजन व्हावे म्हणून तो काहीतरी नवनवीन युक्ती शोधायचा. एकदा त्याला कल्पना सुचली. त्याने विचार केला आज आपण गंमत करू या व ती गमंत गावकऱ्यांसोबत करू या. हाच विचार करून त्याने मोठ्या मोठयाने ओरडायला सुरवात केली. ''वाचावा वाचावा लांडगा आला''.
 
त्याचा आवाज ऐकून सर्व गावकरी हातात काठी घेऊन धावत आले. गावकरी लोक पोहचले व त्यांनी पहिले की, तिथे लांडगा नाही आहे. हे पाहून मेंढपाळ मुलगा हसायला लागला. “हाहाहा, मज्जा आली'' मी तर गमंत करीत होतो. कसे पळत पळत आले सर्व मज्जा आली हाहाहा” त्याने केलेली ही गंमत पाहून गावकऱ्यांना भयंकर राग आला. एक माणूस म्हणाला की आम्ही सगळे आपापली कामं सोडून तुला वाचवायला आलोय आणि तू हसतोयस? असे बोलून सर्वजण आपापल्या कामाला परतले.काही दिवसानंतर गावकर्यांनी परत मेंढपाळचा आवाज ऐकला. “वाचावा वाचावा लांडगा आला” हे ऐकून गावकरी पुन्हा मदतीसाठी धावत आले. गावकरी हातात काठी घेऊन आले व त्यांनी पहिले की मेंढपाळ मस्त उभा राहून त्यांच्याकडे पाहून हसत आहे. आता गावकऱ्यांना राग अनावर झाला व त्यांनी मेंढपाळला खडेबोल सुनावले. आता गावकर्यांनी मेंढपाळावर विश्वास ठेवायचा नाही असे ठरवले.
 
एकदा सर्व गावकरी आपल्या कामात व्यस्त होते. अचानक त्यांना मेंढपाळाचा आवाज ऐकू आला. “वाचवा वाचवा लांडगा आला, लांडगा आलारे आला”, पण कोणीही त्याच्या आवाजावर विश्वास ठेवला नाही. सर्व पुन्हा आपल्या कमाल लागले. मेंढपाळ मोठ्या मोठ्या ने ओरडत होता ''लांडगा आलारे आला'' कारण यावेळेस खरच लांडगा आला होता व मेंढ्यापाळ्च्या एक एक मेंढीचा फडशा पाडत होता. मेंढपाळ खूप घाबरला तो झाडावर चढून बसला. 
 
मेंढपाळ जिवाच्या आकांताने ओरडत राहिला पण कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. लांडग्याने एक एक करून सर्व मेंढ्यांना मारून टाकले. व मेंढपाळ आपल्या मेंढ्याकडे झाडावर बसून पाहत होता व त्याला खूप रडायला येत होते. त्याने गावकऱ्यांची केलेली गमंत आठवली व त्याला त्याचा पश्चाताप झाला.


लांडगा आला रे आला गोष्ट