बातम्या
चरबीच्या गाठी दोन प्रकारच्या असतात
By nisha patil - 5/7/2024 7:23:55 AM
Share This News:
शरिरातील अतिरिक्त चरबी साठविण्यासाठी या गाठी तयार होतात
एक प्रकार असतो LIPOMA ही गाठ कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही वर्षानुवर्षे ही गाठ तुम्ही शरिरावर बाळगू शकता.
दुसरा प्रकार आहे LIPOSARCOMA ही कॅन्सर ग्रस्त गाठ आहे ती शस्त्रक्रिया करुन काढावी लागते ती काढल्यावर कॅन्सरची ट्रिटमेंट घ्यावी लागते
शरीरावरील चरबीच्या गाठी त्रासदायक असू शकतात. काही सामान्य त्रास खालीलप्रमाणे आहेत:
वेदना: चरबीच्या गाठी मोठ्या किंवा जखमी झाल्यास वेदना होऊ शकते.
अस्वस्थता: चरबीच्या गाठी मोठ्या किंवा शरीराच्या हालचालीत अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणी असतील तर अस्वस्थता होऊ शकते.
शैलीचे नुकसान: चरबीच्या गाठी सौंदर्यदृष्ट्या अप्रिय असू शकतात आणि व्यक्तीच्या शैलीचे नुकसान करू शकतात.
जर शरीरावरील चरबीच्या गाठी त्रासदायक असतील, तर त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे.
योग्य आहार:
योग्य आहार आणि नियमित व्यायाम केल्याने वजन कमी होऊ शकते,ज्यामुळे चरबीच्या गाठी कमी होऊ शकतात.
फॅट सेल्स वाढल्यामुळे त्वचा व स्नायु यामध्ये चरबीच्या गाठी तयार होतात. या त्वचेच्या खाली शरीरावर कोठेही ज्याठिकाणी चरबी आहे अशा हात पाय, पोट पाठ, चेहरा, मान याठिकाणी येतात. या गाठी वाटाण्याच्या आकारापासून ते सुपरीच्या आकाराच्या किंवा त्याहूनही मोठया असू शकतात. एक किंवा त्यापेक्षा जास्त असतात. या गाठीमध्ये वेदना नसतात. हलक्या हाताने दाबले तर सहज आपल्या जागेवरून हलतात. स्पर्शाला मऊ असतात.सहसा या गाठी असणाऱ्या व्यक्तीला काही त्रास होत नाही व या गाठी घातकसुद्धा नसतात. तरीही या गाठी शरीरावर आलेल्या असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. सोबत खाली दिलेल्या गोष्टींचे पालन करावे.
व्यायाम करा (कोणत्याही शारीरिक हालचाली)
कोमट पाणी प्यावे.
कोंबडनखी नावाच्या औषधाचे मूळ मिळते त्याला पाण्यात उगाळून गाठीवर लावावे.
कांचनार गुग्गुळ किंवा कांचनार सालीचा काढा घ्यावा.
वजन जास्त असेल तर कमी करा (प्रमाणात ठेवा)
मांसाहार, मद्यपान बंद करा.
तेलकट, तूपकट पदार्थ कमी करा.
फास्ट फूड बंद करा
आपल्याला एक वंजुळ भर बेलाच्या झाडाची पाने घ्यायची आहेत. (महादेवाला वाहतो तीच बेलाची पाने) आता ही पाने थोडेसे मीठ टाकून धुऊन घायची आहेत जेणेकरून पानावरील माती निघून जाईल. आता या पानाची देठे काढायची आहेत आणि मिक्सर च्या भांड्यात टाकायची आहेत. आता भांडे मिक्सर वरती ठेऊन ती पाने चांगली बारीक करायची आहेत त्यात एक एक चमचा पाणी टाकून पुन्हा बारीक करायचा आहे. पानाचा चांगला रस झाला पाहिजे. आता हा तयार झालेला रस गळणीने एका कपात गाळून घ्या.
आता हा रस घ्यायचा कधी. सकाळी तोंड धुतल्यानंतर काही न खाता अर्धा कप रस घ्यायचा आहे. तुम्हाला पहील्यादिवशीच फरक जाणवेल. नवीन गाठ आजिबात येणार नाही आणि जुन्या गाठीचा प्रमाण कमी झालेला तुम्हाला जाणवेल.
आता हा उपाय करायचा किती दिवस. काही जणांना एका दिवसात फरक पडेल तर काहीना एक आठवडा लागेल तर काहींना एक महिना पण लागू शकतो. जो पर्यंत तुमच्या गाठी पूर्ण पणे जात नाहीत तोपर्यंत हा उपाय करावा. जास्तीत जास्त ३ महिने रोज.
चरबीच्या गाठी दोन प्रकारच्या असतात
|