बातम्या
ही लक्षणे सांगतात शरीरात वाढलं आहे Uric Acid, जाणून घ्या हे दूर करण्याचे उपाय.....
By nisha patil - 8/28/2024 7:26:41 AM
Share This News:
यूरिक अॅसिड एक अपशिष्ट पदार्थ आहे जो काही खाद्य पदार्थांमध्ये आढळणाऱ्या प्यूरीन तत्वाच्या तुटण्याने तयार होतो. यूरिक अॅसिड सामान्यपणे रक्तात मिक्स होतं आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा ते जॉइंट्स आणि किडन्यांमध्ये जमा होतं. असं झाल्याने संधीवातासारखी समस्या गाउट आणि किडनी स्टोन होण्याचाही धोका असतो.
यूरिक अॅसिडवर उपचार करण्यासाठी याच्या लक्षणांना वेळीच ओळखणं गरजेचं आहे. यूरिक अॅसिड वाढल्याची काही लक्षणं तुम्हाला लघवीमध्ये दिसू लागतात. चला जाणून घेऊ यूरिक अॅसिड वाढल्यावर लघवीत काय लक्षणं दिसतात आणि ते कमी करण्यासाठी काय करावं.
लघवीमध्ये फेस...
नॅशनल किडनी फाऊंडेशननुसार, लघवीमधून फेस येणं या गोष्टीचा संकेत आहे की, यूरिक अॅसिडने छोट्या स्टोनचं रूप घेतलं आहे. जर यासोबत तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे.
किडनी स्टोन होणं...
यूरिक अॅसिड जेव्हा लघवीसोबत निघत नाही तेव्हा ते क्रिस्टलचं रूप घेतं आणि किडनीमध्ये स्टोन तयार होतात. ज्यामुळे गंभीर वेदना, लघवीतून रक्त आणि पुन्हा लघवीच्या मार्गात इन्फेक्शन होऊ शकतं.
गर्द रंगाची लघवी...
गर्द किंवा लाल रंगाची लघवी येणं संकेत आहे की, तुमच्या किडनीमध्ये सगळं काही ठीक सुरू नाही. यातून हे दिसतं की, तुमच्या किडनीमध्ये यूरिक अॅसिडशी संबंधित स्टोन बनत आहे किंवा लघवीसंबंधी समस्याचं एक संभावित लक्षण असू शकतं.
पुन्हा पुन्हा लघवी...
काही लोकांना लघवीदरम्यान वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. खासकरून किडनीमध्ये स्टोन किंवा लघवीच्या मार्गात अडथळा असणं. पुन्हा पुन्हा लघवीची ईच्छा हेही एक यूरिक अॅसिडसंबंधी लक्षण असू शकतं.
ही लक्षण दिसल्यावर काय करावे...
जर तुम्हाला यूरिक अॅसिडसंबंधी वरील लक्षण दिसत असतील तर तुम्हाला वेळीच डॉक्टरांकडे जायला हवं. ते यूरिक अॅसिडचं प्रमाण बघण्यासाठी टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात.
यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी काय करावे...
पाणी भरपूर प्यायल्याने... यूरिक अॅसिड पातळ करण्यास मदत मिळते आणि लघवीच्या माध्यमातून ते बाहेर पडतं. दिवसातून कमीत कमी 10-12 ग्लास पाणी प्यावे.
जास्त प्यूरीन असणारे पदार्थ सेवन करणं बंद करा...
जसे की, ऑर्गन मीट, रेड मीट, समुद्री मासे आणि काही भाज्या जसे की, शतावरी व पालक.
कमी फॅट असलेले डेअरी उत्पादनं जसे की, दूध आणि दही यूरिक अॅसिडचं प्रमाण करण्यासाठी मदत करतात.
मद्यसेवन खासकरून बीअर आणि स्प्रिट, यूरिक अॅसिड उत्पादन वाढवू शकतात. यांचं सेवन बंद करा.
ही लक्षणे सांगतात शरीरात वाढलं आहे Uric Acid, जाणून घ्या हे दूर करण्याचे उपाय.....
|