बातम्या

पाण्यापेक्षाही जास्त शक्ती देतात या गोष्टी, जवळही येणार नाही उष्णता.....

These things give more power than water


By nisha patil - 8/5/2024 11:20:36 AM
Share This News:



दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. हीटवेव्हचा धोकाही वाढत आहे. अशात शरीराचा डिहायड्रेशनपासून बचाव करणं फार गरजेचं होऊन बसतं. शरीरात पाणी कमी झालं तर एनर्जी राहत नाही. तुम्हाला विकनेस जाणवू शकतो. इतकंच नाही तर जीवालाही धोका होतो.

या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण बरेच लोक वेगवेगळ्या कारणाने किंवा आळसामुळे पाणी कमी पितात. असे लोक गोष्टींचं सेवन करून शरीराचं तापमान योग्य ठेवू शकतात. या गोष्टींमधून शरीराला पोषक तत्वही मिळतात. तसेच गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्याही दूर करता येतात. न्यूट्रिशनिस्ट श्वेता पांचाल यांनी अशाच काही गोष्टींबाबत सांगत आहेत.

बेलाचा ज्यूस...
हे एक देशी फळ आहे. जे उष्णता आपल्यापासून दूर करतं. या फळाच्या गरामध्ये अनेक न्यूट्रिएंट असतात. हे पोषक तत्व हीट स्ट्रोक, डायरिया आणि इतरही पोटांसंबंधी आजारांपासून बचाव करतात. हे शरीराला हायड्रेट करून एनर्जी देण्याचं काम करतात. 

कलिंगड-खरबूज...
उन्हाळ्यात कलिंगड आणि खरबूज आवर्जून खाल्ले पाहिजे. या दोन्हीतून शरीराला खूपसारे फायदे मिळतात. यात पाणी आणि फायबर भरपूर असतं. शरीर यानी हायड्रेट राहतं सोबतच मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, बी-कॉम्पेक्स व्हिटॅमिन्स मिळतात. 

दही आणि ताक...
या दिवसांमध्ये पोटाची उष्णता खूप वाढते. यामुळे उलटी, पोटदुखी, पोटात जळजळ, जुलाब, भूक न लागणे यासारख्या समस्या होतात. काही लोकांना  तिखट पदार्थ खाऊन गॅसची समस्या होते. अशात दही आणि ताक शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात. 

नारळ पाणी आणि मलाई...
नारळ पाणी शरीरासाठी फार हेल्दी असतं. यातून शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट मिळतात जे घामाच्या माध्यमातून निघून जातात. न्यूट्रिशनिस्ट म्हणाल्या की, उन्हाळ्याच्या दिवसात कमीत कमी एक नारळ पाणी प्यायला हवं. सोबतच नारळाची मलाई सुद्धा सेवन करावी.


पाण्यापेक्षाही जास्त शक्ती देतात या गोष्टी, जवळही येणार नाही उष्णता.....