बातम्या

अति गोड खाल्ल्यास चेहऱ्यावर दिसतात हे तीन निशाण

These three signs appear on the face if you eat too much sweets


By nisha patil - 10/7/2024 7:26:05 AM
Share This News:



अनेक लोकांना गोड खाण्याची खूप सवय असते. तसेच ते केव्हाही गोड खाऊ शकतात. काही लोक असे देखील असतात ज्यांना उठल्यावर गोड खायला लागते. अति गोड खाल्ल्यास आरोग्याला खूप नुकसान होण्याची शक्यता असते. अति गोड खाल्ल्यास वजन वाढते, मानसिक आजार आणि त्वचे संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. जास्त गोड खाल्ल्यास शरीरात सोडियम आणि पोटेशियमचे जे नैसर्गिक नियंत्रण असते ते बिघडते.मरुमची समस्या-  
गरजेपेक्षा जास्त गोड खाल्ल्यास चेहऱ्यावर मुरूम यायला सुरवात होते. तसेच, गोड खाल्ल्याने इंसुलिन नावाचे  हार्मोन वाढते. ज्यामध्ये मुरुमची समस्या वाढते. मुरूम मुळे त्वचेवर बॅक्टिरियल आणि फंगल इंफेक्शन होण्याचा धोका असतो. डायबिटीज रुग्णांमध्ये ही समस्या जास्त असते.
 
वयस्कर दिसण्याची समस्या-
जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त गोड खात असाल तर यामुळे तुमच्यामध्ये एजिंगची समस्या वाढू शकते. तसेच साखरेमुळे त्वचेवर सुरकुत्या येतात. ज्यामुळे वेळेच्या आधीच वय वाढलेल दिसते. डार्कनेस समस्या- 
पिंपल आणि पिगमेंटेशन शिवाय अनेक लोकांना गोड खाल्ल्यामुळे डार्कनेसची समस्या निर्माण होते. ही समस्या लवकर बरी होत नाही. जर तुम्हाला त्वचेवर अशी समस्या दिसत असले तर गोड खाणे टाळावे.


अति गोड खाल्ल्यास चेहऱ्यावर दिसतात हे तीन निशाण