बातम्या
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरण...
By nisha patil - 3/27/2025 4:41:29 PM
Share This News:
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरण...
मोबाईल मधील डेटा उडवल्याची दिली कबुली...
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मोबाइलवरून धमकी दिल्याच्या प्रकरणात प्रशांत मुरलीधर कोरटकर (वय ५०, रा. बेचा परिसर, नागपूर) याच्या आवाजाचे नमुने बुधवारी (दि. २६) फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी घेतले.
यापूर्वी मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत पाच तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत पोलिसांना अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा मिळाला आहे.डेटा डिलिट करून चेन्नईला पळण्याच्या तयारीत होता आरोपी चौकशीत कोरटकरने मोबाइलमधील सर्व डेटा स्वतः डिलिट केल्याची कबुली दिली. इतकेच नव्हे, तर पोलिसांना चकवा देऊन हैदराबादमार्गे चेन्नईला पलायन करण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.पोलिसांनी आता फॉरेन्सिक तपासणीद्वारे आरोपीच्या आवाजाची तुलना करून पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरण...
|