बातम्या
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
By nisha patil - 2/28/2025 5:28:11 PM
Share This News:
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
कोल्हापूर : प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. "तुमचा खात्मा करू" असा धमकीचा मजकूर असलेल्या कॉलमुळे खळबळ उडाली आहे. सावंत यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
इंद्रजित सावंत यांनी ऐतिहासिक संशोधनाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे विषय उघड केले असून, त्यांच्या कार्यामुळे अनेक वादंग निर्माण झाले आहेत. यापूर्वीही त्यांना अशा स्वरूपाच्या धमक्या मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी थेट प्राणघातक इशारा मिळाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
|