बातम्या

थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद.....

Tired of not getting the job done


By nisha patil - 7/13/2024 7:22:51 AM
Share This News:



दिवसभरात एक गोष्ट देखील शरीराला अफाट शक्ती देऊ शकते (Sadguru). कर्नाटकातील काही जमातींना जेनुकुरुबा म्हणतात. त्यांना दररोज ३० ते ४० किलोमीटर जंगलात फिरावे लागते (Health Tips). किमान ५० झाडांवर चढून आणि उतरून काम करावे लागते. एवढी मेहनत घेऊन ते काम करतात, दिवसभर हे काम करण्यासाठी शरीराला शक्ती आणि उर्जेची गरज भासते (Honey and warm Water). यासाठी ते मधाचे सेवन करतात.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले होते की, कर्नाटकातील ही लोकं सकाळी सर्वात आधी मध पितात. तीन-चतुर्थांश लिटर मध पितात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. मध रोज खाल्ल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. दिवसात किती मध खावे हे तुमच्या शरीरावर अवलंबून असते. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा'

दररोज मध खाण्याचे फायदे...
दररोज मध खाण्याचे अनेक फायदे आहेत. सद्गुरूंच्या मते ज्यांना कफाची समस्या आहे, त्यांनी मधाचे सेवन करावे. यामुळे कफाची समस्या आपल्याला छळणार नाही.

१ चमचा मध खाण्याचे फायदे...
- हृदयासाठी फायदेशीर.

- मेंदूसाठी उत्तम.

- उर्जा प्रदान करते.

- मानसिक आरोग्य सक्रीय ठेवते.

मध खाण्याची योग्य पद्धत...
सद्गुरू सांगतात, मध खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण ते गरम करून खाऊ नये. पण आपण कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता. कोमट पाण्यात मध घातल्याने एक विशेष एंझाइम तयार होते. जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. जर आपण थंड पाण्यात मध घालून पीत असाल तर, वजन वाढू शकते.

लोहाची कमतरता निर्माण होत नाही...
ॲनिमियाच्या रुग्णांमध्ये लोहाची कमतरता असते. यामुळे शरीरातील उर्जा कमी होणे, थकवा जाणवणे, शरीराच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन न पोहोचणे अशा समस्या उद्भवू शकतात. यावर उपाय म्हणून कोमट पाण्यात मध मिसळून प्या. यामुळे लाल रक्तपेशी वाढू शकतात.

सकाळी अशा प्रकारे मध प्या...
कडुलिंब आणि हळदीच्या पाण्यात मध घालून प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडते. ज्यामुळे शरीरातील लवचिकता वाढते, आणि आजारांचा धोकाही कमी होतो.


थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद.....