राशिभविष्य

आजचे राशिभविष्य २४ फेब्रुवारी २०२५

Todays Horoscope 24 February 2025


By nisha patil - 2/24/2025 7:19:00 AM
Share This News:



मेष आज तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सौख्य अनुभवाल. मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि नवीन ओळखींचे स्वागत करा. 

वृषभ  मैत्रीतील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने कामे हाती घ्या आणि जनसंपर्क वाढवा. रागावर नियंत्रण ठेवा. 

मिथुन वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाचा व्याप सांभाळावा लागेल, त्यामुळे आततायीपणा टाळा. धैर्याने कामे करा. 

कर्क  प्रवासाचा योग संभवतो. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. अपयशाला घाबरू नका आणि वादांपासून दूर राहा. 

सिंह पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. व्यवसायात धावपळ होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाची इतरांवर छाप पाडाल. रागावर ताबा ठेवा. 

कन्या  विरोधक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमची जिद्द महत्त्वाची ठरेल. कष्टाने कार्य पार पाडाल. मित्रांची भेट होईल. 

तूळ नोकरीत वर्चस्व राहील. मित्रांना मदत करावी लागेल. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा. वरिष्ठांकडून कौतुक होईल. 

वृश्चिक  काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. गोड बोलून व्यवसायात वाढ करता येईल. आत्मविश्वास वाढेल. थकबाकी वसूल कराल. 

धनु  कौटुंबिक जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडाल. आर्थिक लाभ संभवतो. प्रवास सुखकर होतील. 

मकर : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. 

कुंभ सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. मित्रपरिवाराचा आधार मिळेल. आरोग्य चांगले राहील. 

मीन व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.


आजचे राशिभविष्य २४ फेब्रुवारी २०२५
Total Views: 31