राशिभविष्य
आजचे राशिभविष्य ४ एप्रिल २०२५
By nisha patil - 3/4/2025 11:44:51 PM
Share This News:
मेष कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे. प्रामाणिकपणे काम करा; नशिबाची साथ मिळेल. अनावश्यक खर्च टाळा.
वृषभ आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नवाढीचे नवीन मार्ग मिळतील. कुटुंबासोबत वेळ घालवा; संबंध मजबूत होतील.
मिथुन मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी आणि वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.
कर्क : कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कुटुंबासोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
सिंह : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस फलदायी आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या; पचनसंस्थेच्या तक्रारी संभवतात.
कन्या: धावपळीचा दिवस असेल. छोटी-मोठी कामे पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागेल. आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो; खर्चांवर नियंत्रण ठेवा.
तूळ मिळकतीचे नवीन मार्ग खुले होतील. सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : व्यवसायात अडथळे येऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहा. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परिस्थिती सुधारेल.
धनु: प्रवासाचा योग आहे. नवीन लोकांशी ओळख होईल. आर्थिक गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा.
मकर: कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ: खर्च वाढण्याची शक्यता आहे. बजेटनुसार खर्च करा. कुटुंबासोबत वेळ घालवा; नातेसंबंध सुधारतील.
मीन : व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. नवीन संधी मिळतील. आरोग्य उत्तम राहील; मात्र आहारावर नियंत्रण ठेवा.
आजचे राशिभविष्य ४ एप्रिल २०२५
|