बातम्या

बाळुमामा भंडारा यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी

Traffic regulation order issued during Balumama Bhandara Yatra


By nisha patil - 3/25/2025 7:43:13 PM
Share This News:



बाळुमामा भंडारा यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी

कोल्हापूर, दि. २५: श्री बाळुमामा भंडारा यात्रा (दि. २६ ते २९ मार्च २०२५) कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये वाहतूक नियमन आदेश जारी केले आहेत.

यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात, त्यामुळे मुदाळ तिट्टा ते निढोरी मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच, आदमापूर येथील उड्डाणपुलाखाली आणि मुदाळ तिट्टा ते निढोरी मार्ग हा नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे.

🔹 वाहतूक वळविण्याचे मार्ग:

  • मुरगूड-कोल्हापूर, गारगोटी, राधानगरीकडे जाणारी वाहतूक निढोरी-सोनाळी-बिद्री-मुदाळ तिट्टा मार्गे

  • मुदाळ तिट्टाकडून मुरगूड-निपाणी वाहतूक कुर-व्हणगुत्ती-वाघापूर फाटा-निढोरी मार्गे

🔹 पार्किंग व्यवस्था:

  • आदमापूर - भीष्मा पार्किंग (उत्तर व दक्षिण), आर. के. इंजिनियरिंग पार्किंग, पाटणे मिल पार्किंग

  • मुदाळ - गणपतराव फराकटे पार्किंग

🔹 वाहतूक बंदी आणि अपवाद:

  • हे निर्देश सर्वसामान्य वाहनांसाठी लागू असतील.

  • शासकीय व आपत्कालीन वाहनांना सूट देण्यात आली आहे.

भाविकांनी वाहतूक नियमानुसार सहकार्य करावे आणि नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


बाळुमामा भंडारा यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी
Total Views: 12