बातम्या
त्रयोदशगुणी विडा.....
By nisha patil - 6/29/2024 6:46:58 AM
Share This News:
विडय़ातील प्रत्येक पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असतो....
*१. कात :*अतिसार थांबवणे व कंठशुद्धी करणे.
*२. जायफळ : तोंडाची दुर्गंधी दूर करणे.
*३. ओवा : पोटदुखी थांबणे.
*४. सुपारी : दात बळकट होतात.
*५. वेलदोडा : अन्नपचन सुधारते.
*६. लवंग : दुर्गंधी व कफ कमी होते.
*७. बडीशेप : वायुहारक, बुद्धिमत्तावर्धक.
*८-९. सुके /ओले खोबरे : बुद्धिवर्धक, त्वचारोग टाळते व घाम येणे कमी होते.
*१०. ज्येष्ठमध : आवाज सुधारतो.
*११. कापूर : जंतुनाशक.
*चुना : कफाचा नाश व उलटी थांबते.
*१२. केशर : सर्दी कमी होते.
*१३. नागवेलीची पाने : सुवासिक व दुर्गंधीनाशक.
-------------
अशा या तेरा पदार्थानी व तेरा गुणांनी युक्त असा त्रयोदशगुणी विडा, बहुगुणी विडा सर्वानी अवश्य खावा, पण नीट चावून चावून खावा.
आता पूर्वीप्रमाणे घरोघरी पानदान दिसत नाही. पण चौकाचौकात पानाचे ठेले दिसतात. तिथे तयार पाने मिळतात. त्यामुळे लोकांना पान, विडा व त्यातील पदार्थ माहितीच नाहीत. पूर्वीसारखी एकत्र कुटुंबे नाहीत त्यामुळे आजोबा नाहीत व त्यांचा खलबत्ता, पीकदाणी, चंची, अडकित्ते आणि ते शब्दही काळाबरोबर नाहीसे झाले.
त्रयोदशगुणी विडा.....
|