बातम्या

वजन कमी करण्यासाठी ‘त्रिफळा’ उपयोगी

Triphala is useful for weight loss


By nisha patil - 7/19/2024 7:43:03 AM
Share This News:



जन वाढण्याच्या समस्येला कंटाळून अनेक लोक उपाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा आणि वेळ खर्च करतात. मात्र घरगुती उपायांकडे दुर्लक्ष करतात. त्रिफळा वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम यांच्या जोडीला त्रिफळाचे सेवन फायदेशीर ठरते. आमलकी, बिभितकी, आणि हरीतकी या तीन औषधी फळांच्या संगमाने त्रिफळा ही आयुर्वेदिक औषधी तयार केली जाते.

त्रिफळाच्या मदतीने ‘असे’ करा वजन कमीत्रिफळा आणि गरम पाणी –
त्रिफळाचे सेवन करण्याकरिता अर्धा लहान चमचा त्रिफळा चूर्ण एक कप गरम पाण्यामध्ये मिसळावं. हे पाणी थंड झाल्यानंतर त्याचे सेवन करा.


त्रिफळा आणि मध –
रात्री झोपण्यापूर्वी २ चमचे त्रिफळा गरम पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या व त्यात मध मिसळून प्या. काही दिवसात वजन नक्कीच कमी होईल. त्रिफळा घेताना शक्यतो रिकाम्या पोटी घ्यावे.

त्रिफळाचे इतर महत्वाचे फायदे –
त्रिफळा हे नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट आहे. त्रिफळाच्या सेवनाने शरीरातील घातक द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. तसेच नियमित सेवनाने पचनाशी निगडीत तक्रारी दूर होतात. तसेच ज्यांना भूक लागत नसेल, त्यांनी त्रिफळाचे नियमित सेवन करावे. त्रिफळामध्ये वापरले जाणारे आमलकी, बिभितकी, आणि हरीतकी तीनही घटक शरीराला लाभकारी आहेत. आमलकी शरीराला थंडावा देते , शरीरातील उष्णता कमी करते , पित्त शमवते. बिभितकी कफ व श्वसनासंबंधीच्या तक्रारी दूर करते तर हरीतकी कफ, वात आणि पित्त या दोषांना दूर करते.


वजन कमी करण्यासाठी ‘त्रिफळा’ उपयोगी