बातम्या

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला दोन राष्ट्रीय पुरस्कार

Two National Awards for Mukhyamantri Solar Krishi Vahini Yojana


By nisha patil - 2/3/2025 10:34:19 PM
Share This News:



मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला दोन राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, २ फेब्रुवारी २०२५ – महावितरणला ‘गव्हर्नन्स नाऊ’ सार्वजनिक उद्योग पुरस्कार सोहळ्यात दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘एक्सलन्स इन प्रोसेस इनोव्हेशन’ आणि ‘बेस्ट यूज ऑफ ऑटोमेशन अँड डिजिटल टेक्नॉलॉजीज’ या गटांत गौरव करण्यात आला.

🔹 सौर ऊर्जा निर्मितीसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित
🔹 वीज उपकेंद्रांसाठी अत्याधुनिक ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ बसविणे
🔹 कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे वीज पुरवठ्याचे स्मार्ट व्यवस्थापन

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी या यशाबद्दल अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली योजना अंमलात आणली जात आहे.


मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला दोन राष्ट्रीय पुरस्कार
Total Views: 21