बातम्या
पन्हाळावर युनेस्को धास्ती युनेस्को जाण्या पासून वाचवा गावकऱ्यांचे पुन्हा एकदा गाव सभेचे आयोजन.
By nisha patil - 3/30/2025 11:56:57 PM
Share This News:
पन्हाळावर युनेस्को धास्ती युनेस्को जाण्या पासून वाचवा गावकऱ्यांचे पुन्हा एकदा गाव सभेचे आयोजन.
पन्हाळा प्रतिनिधी , शहाबाज मुजावर, पन्हाळगडच्या युनोस्को पासून वाचवा पहिल्या गाव सभेच्या दिनांक 9 मार्च 2025 रोजी, मीटिंगमध्ये ठरले होते, जैसलमेर, हम्पी, बदामी या ठिकाणी भेट देऊन तिथे परिस्थिती पाहणे, इतिहास अभ्यासकरांना भेटणे ,तसेच स्थानिक आमदार खासदारांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून निवेदन ,त्यानुसार पन्हाळगडावरची कृती समितीचे सदस्य,रामानंद गोसावी , रमेश स्वामी, किरण महाजन , रमेश भोसले, जीवन पाटील हे पाचजण जैसलमेर गेले होते.
.%5B6%5D.jpg)
आज दिनांक 30 मार्च 2025 सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा गाव सभेचे नियोजन केले होते.या बैठकीत जैसलमेर ला भेट देण्यासाठी गेलेल्या पन्हाळ्यातील प्रतिनिधिंनी तेथील काय काय आढावा घेतला. त्याची माहिती स्थानिक नागरिकांच्या मनामधील असलेली संभ्रमावस्था, शंका या सर्वांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.
.%5B6%5D.jpg)
यावेळी या सदस्यांनी जैसलमेर चे नगराध्यक्ष मा. श्री हरिवल्लभ कल्ला ची भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच युनोस्को झाल्यापासून इथे कसल्याही प्रकारचा निधी उपलब्ध झाला नाही.जसे पहिला किल्ला होता. तसेच आता आहे.यामध्ये कसले प्रकारचे बदल झाले नाही आहेत. फक्त जगाच्या नकाशावर या जैसलमेर गेले आहे. असे त्यांनी सांगितले. याचा काय आम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला नाही. असे परकट मत जैसलमेर नगराध्यक्ष यांनी या सदस्याच समोर मांडले.
.%5B7%5D.jpg)
गोसावी या सदस्यांनी सांगितले की, पन्हाळगड ची जैसलमेर ची परिस्थिती वेगळी आहे.त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची शासकीय कार्यालय नाहीत. शाळा सुद्धा नाही. त्यांचा प्रश्न वेगळा आहे.आपला प्रश्न वेगळा आहे. त्यामुळे आपण युनोस्कोमध्ये जाणे परवडणार नाही. असे त्यांचे वैयक्तिक गोसावी यांची मत आहे आहे. यावर गाववाल्यांनी सांगितले की, ठीक आहे मग आपण युनोस्कोमध्ये जाणार नाही.आसा ठाम निर्णय गाववाल्यांनी घेतला.
या पाच सदस्यांचा पन्हाळगडावरील रहिवासीयांकडून मयूर उद्यान या ठिकाणी शाल शिरफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सर्व सदस्यांचे गावात त्यांचे कौतुक करण्यात आले. कारण ते स्वतःचा पैसा वेळ काढून गावासाठी जैसलमेर या ठिकाणी गेले होते.
.%5B4%5D.jpg)
ॲड. श्री रवींद्र तोरसे, यांनी सांगितले की, एएसआय कडे आम्ही माहितीच्या अधिकार मध्ये व्यवसाय करण्यासाठी त्यांची नियम मागितल्या होते. परंतु असे,कशाही प्रकारची निर्बंध नियम नाहीत.असे त्यांचे उत्तर आले आहे, पुण्यातील शनिवार वाड्यात च्या आजूबाजूस केस मुंबई उच्च न्यायालयात चालू आहे कि, त्या ठिकाणी ती निर्बंध लावले आहेत. ते पंधरा मीटर करा असा त्यांचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये आपण सामील व्हावे. असा सल्ला तौरसे यांनी दिला. आपला पन्हाळा किल्ला वर पण बांधकामाची निर्बंध तडबंदीपासून 100 मीटर आहे. ते 15 मीटर बांधकाम दुरुस्ती, नवीन बांधकाम, परवानाची अडथळे येत आहे. त्यासाठी आपण त्या रिपीटेशन मध्ये ऍड होऊया असा सल्ला गाववाल्यांना दिला.
ज्येष्ठ पत्रकार राजू मुजावर, यांनी युनोस्को मध्ये सामील होण्यासाठी दहा निकष युनोस्को निवडत असते ,जागतिक वारसा 2004 च्या अखेरीपर्यंत सहा सांस्कृतिक आणि चार नैसर्गिक निकषांच्या आधारे जागतिक वारसा स्थळांची निवड करण्यात यावी असे युनेस्को च्या घटनेत आहे .असे सांगून लोकांना जागृत केले की, आपण कोणत्याही निकष नुसार आपला पन्हाळा किल्ला हा युनोस्कोमध्ये बसू शकत नाही.
यावेळी युनोस्को मध्ये जाण्यासाठी पन्हाळा वासियांनी कडाडून विरोध केला. यासाठी पन्हाळकरना 10 एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी यांनी गाव सभा घेऊन सर्व लोकांना लेखी ,नियम ,आटीशर्ती जे काय आहे ते सांगावे,युनेस्को मध्ये पन्हाळा जात असताना येथील नागरीवस्ती ,स्थानिक, लोकांचेव्यवसाय, तालुकास्तरीय, शासकीय कार्यालये या बाबतीत शासन ची भूमिका शासनाने लेखी स्वरूपात स्पष्ट करावी, नागरी वस्ती अन्यत्र हलवू नये. कार्यालये पन्हाळ्यातच राहिली पाहिजेत, कसले प्रकारचे व्यवसाय जे सध्या चालू आहेत ते व्यवसाय बंद होता कामा नयेत, नव्या बांधकाम विषयक अटी लादू नयेत, आणि या बाबतीत समभ्रम आहे तो दूर करावा जिल्हाधिकारी यांच्या समक्ष बैठीकी मध्ये लेखी हमी देऊन या बाबतीत खुलासा व्हावा.
नाहीतर पन्हाळा वाघबीळ- रत्नागिरी हायवे या ठिकाणी रस्ता रोको करण्यात येणार आहे. पन्हाळा प्रांत कार्यालय ,साखळी उपोषण, धरणेआंदोलन, पन्हाळा बंद करण्यात येईल.घेराव ,मोर्चा, इ. सनदशीर मार्गाने या बाबतीत शासनाला विरोध दर्शविला जाईल.असा इशारा यावेळी सर्व गावकऱ्यांनी दिला आहे. तसेच मंगळवार दिनांक 01 एप्रिल 2025 रोजी प्रांताधिकारी यांना याबाबत निवेदन देण्याचे ठरले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी, आसिफ मोकाशी ,माजी उपनगराध्यक्ष ,चेतन भोसले, जमीर गारर्दी, माजी नगरसेवक, अख्तर मुल्ला, नियाज मुल्ला, संग्राम भोसले ,अकिब मोकशी, महेश कुऱ्हाडे, संभाजी गायकवाड,आनंद जगताप ,भीमराव काशीद , मंदार नायकवडी, मुबारक मुजावर, धनंजय बच्चे ,दिलीप दळवी, राजू आगा, अमोल वाडेकर, काशिनाथ बुरुड, स्थानिक गडावरचे नागरिक, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पन्हाळावर युनेस्को धास्ती युनेस्को जाण्या पासून वाचवा गावकऱ्यांचे पुन्हा एकदा गाव सभेचे आयोजन.
|