बातम्या
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदांची एकमताने निवड...
By nisha patil - 12/3/2025 6:00:20 PM
Share This News:
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदांची एकमताने निवड...
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री नारायण चव्हाण आणि श्री दिलीप उलपे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या संचालक पदांवर श्री बाजीराव चौगले आणि श्री धीरज उलपे यांची एकमताने निवड करण्यात आली.
प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेव रावजी महाडिक यांच्या हस्ते नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखानाचे उपाध्यक्ष गोविंदा चौगले, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यासह अन्य संचालक, कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदांची एकमताने निवड...
|