बातम्या
आरोग्यसेवा आणि अध्यात्माची एक प्रेरणादायी वाटचाल - डॉ. वंदना पवार
By nisha patil - 12/3/2025 6:25:18 PM
Share This News:
आरोग्यसेवा आणि अध्यात्माची एक प्रेरणादायी वाटचाल - डॉ. वंदना पवार
डॉ. वंदना पवार या पेशाने पॅथॉलॉजिस्ट असून, समाजसेवेची उच्च भावना बाळगणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. आरोग्यसेवेमध्ये योगदान देताना त्या नेहमीच गरजू रुग्णांच्या हिताचा विचार करतात. त्यांच्या जवाहर नगर येथील पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्यल्प दरात रुग्णांसाठी चाचण्या उपलब्ध करून दिल्या जातात. या माध्यमातून त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.
आरोग्यसेवेसोबतच सामाजिक बांधिलकीचा वारसा जोपासत, डॉ. वंदना पवार यांनी "वीर काय समाजा"च्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांसाठी अतुलनीय सेवा दिली आहे. गरजू, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मदतीचा हात देण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत. या समाजसेवेच्या कार्यामुळे त्या समाजात एक आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात.
केवळ आरोग्यसेवेतच नव्हे, तर अध्यात्म आणि मानसिक आरोग्य याचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठीही डॉ. वंदना पवार सतत कार्यरत आहेत. "सहज सेवा" या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी योग आणि अध्यात्म यांचे मार्गदर्शन केले आहे. समाजातील लोकांनी तणावमुक्त जीवन जगावे, आत्मशांती आणि मानसिक स्थैर्य मिळवावे, या उद्देशाने त्या अनेक योग शिबिरांचे आयोजन करतात. योग आणि अध्यात्माच्या माध्यमातून लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत.
आरोग्यसेवा आणि अध्यात्माची एक प्रेरणादायी वाटचाल - डॉ. वंदना पवार
|