बातम्या

"वेडात मराठे वीर दौडले सात" सायकल मोहिमेने शिवजयंतीला मानवंदना

Vedat Maratha Veer Daudle Saat


By nisha patil - 2/26/2025 2:46:33 PM
Share This News:



"वेडात मराठे वीर दौडले सात" सायकल मोहिमेने शिवजयंतीला मानवंदना

कोल्हापूर ते पारगड ३९५ किमी सायकल परिक्रमेने इतिहासाला अभिवादन

शिवजयंतीनिमित्त ३९५ किमी सायकल परिक्रमा;

ध्येयवेड्या सायकलस्वारांचा ऐतिहासिक उपक्रम


श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे आयोजित "वेडात मराठे वीर दौडले सात" या विशेष सायकल मोहिमेने ३९५ व्या शिवजयंतीनिमित्त ऐतिहासिक गड-किल्ल्यांना अभिवादन करण्यात आले. फिटनेस आयकॉन अक्षय कुमार फॅन्स क्लबच्या सात ध्येयवेड्या सायकलस्वारांनी कोल्हापूर-नेसरी-प्रतापराव गुजर स्मारक-इचलकरंजी-पन्हाळा मार्गे तब्बल ३९५ किलोमीटरचा खडतर प्रवास पार करत शिवरायांना मुजरा केला.

या मोहिमेचा उद्देश शिवरायांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि अतिक्रमण रोखण्याबाबत जनजागृती करणे तसेच प्रदूषणमुक्त जीवनासाठी सायकलचा अधिकाधिक वापर प्रोत्साहित करणे हा होता. मोहिमेच्या शेवटी पारगड किल्ल्यावर पोहोचून वीर शिवसैनिकांना अभिवादन करण्यात आले.
या मोहिमेत क्लबचे अध्यक्ष राम मोहन कारंडे, पांडुरंग माळी, दीपक सावेकर, सचिन यादव, दत्तात्रय चौगुले, प्रकाश ओतारी आणि विशेष म्हणजे अवघ्या १४ वर्षांचा समर राम कारंडे यानेही सहभाग घेतला. त्याच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे विशेष कौतुक होत आहे.या ऐतिहासिक मोहिमेच्या यशस्वी समारोपानंतर श्री शिवाजी तरुण मंडळाने या सात सायकलस्वारांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि ऐतिहासिक वारसाच्या जतनासाठी केलेल्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


"वेडात मराठे वीर दौडले सात" सायकल मोहिमेने शिवजयंतीला मानवंदना
Total Views: 23