बातम्या
शाकाहारी लोकांना किडनीचे आजार होण्याचा धोका कमी
By nisha patil - 8/13/2024 9:29:15 AM
Share This News:
अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कुल ऑफ हेल्थच्या शास्त्रज्ञांनी १४ हजार ६८६ लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी व किडनीचे आरोग्य यांचे अध्ययन केले. त्यांच्यातील सुमारे निम्म्या लोकांवर २४ वर्षे नजर ठेवण्यात आली. शास्त्रज्ञांना त्यात असे आढळून आले की, आरोग्यदायी शाकाहारी आहार घेणाऱ्या लोकांमध्ये शाकाहारापासून दूर राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत किडनीच्या विकारांचा धोका १४ टक्के कमी असतो.
याव्यतिरिक्त शाकाराही जंक फूड खाणाऱ्यांमध्ये हा धोका ११ टक्क्यांनी वाढतो. पूर्वीच्या अध्ययनांमध्येही जंक फूड आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे म्हटले आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, गेल्या ३० वर्षांमध्ये फास्ट फूडमध्ये गैर आरोग्यदायी घटकांचे प्रमाण २२६ टक्क्यांनी वाढले आहे. या अध्ययनात शास्त्रज्ञांनी दहा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फास्ट फूड चेनच्या १७८७ मेन, साइड्स व डेजर्ट खाद्यपदार्थांचा अभ्यास केला. त्यात फास्ट फूडमधील सोडियमचे प्रमाण अतिशय वाढल्याचे दिसून आले. किडनीच्या आरोग्यासाठी शाकाहार सर्वोत्तम आहे. म्हणूनच शाकाहारापासून दूर राहणारे लोकही आता शाकाहारी होण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यात जर शाकाहारी जंक फूडचा मार्ग अवलंबला तर ते शरीराला भारी पडू शकते.
शाकाहारी लोकांना किडनीचे आजार होण्याचा धोका कमी
|