विशेष बातम्या
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड
By nisha patil - 4/4/2025 10:58:43 PM
Share This News:
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले. भारतीय चित्रपटात एक काळ गाजवलेल्या मनोज कुमार यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी केलेल्या विविध देशभक्तीपर चित्रपटांमध्ये भारत हे नाव त्यांना मिळाले होते. आत्ताच्या पाकिस्तानात जन्म लहानपणीचे संघर्षमय दिवस हे हिंदी चित्रपट सुशीतील महत्त्वाचे नायक असा त्यांचा प्रवास झाला होता.
हरी किशन गिरी गोस्वामी हे त्यांचे मूळ नाव होते. 1957 मध्ये फॅशन चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. त्यांची चित्रपट कार्यकर्तेला सुरुवात झाली. पण 70 च्या दशकात त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले. चित्रपटात येण्यापूर्वी त्यांनी व्यावसायिक कारणासाठी दिलीप कुमार यांच्या वरून प्रेरित होऊन मनोज कुमार असे नाव घेतले. त्या त्या काळातील सामाजिक व राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब त्यांचे चित्रपटातून उमटले. मनोज कुमार यांना 2016 दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. भारत सरकारने चित्रपट सुट्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना पद्मश्री सन्मानाने 2002 मध्ये गौरवले
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड
|