बातम्या
मोठ्या आवाजात टीव्ही पाहणे, गाणी ऐकणे मुलांसाठी घातक, २ आजारांचा धोका, तज्ज्ञ सांगतात.....
By nisha patil - 8/7/2024 11:31:20 AM
Share This News:
टीव्ही, मोबाईल अशी उपकरणं आता प्रत्येक घराघरांत आहेत. बहुतांश जणांच्या घरामध्ये तर असतेच पण कारमध्येही साऊंड सिस्टिम असते. त्यामुळे घरात, गाडीत मुलं किंवा त्यांचे पालक गाणी ऐकतात. टीव्हीचा वापर तर जवळपास सगळ्यात घरात होतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तो जरुर करा. पण गाणी ऐकताना किंवा टीव्ही पाहताना त्याच्या आवाजाची पातळी कुठवर चढते आहे याकडे मात्र कटाक्षाने लक्ष द्या, असं तज्ज्ञ सांगतात. बहुतांश घरांमध्ये खूप मोठा आवाज करून टीव्ही पाहिला जातो किंवा गाणी ऐकली जातात. पण असं करणं मुलांसाठी किती धोकादायक आहे आणि त्याचा मुलांच्या मानसिक, शारिरीक आरोग्यावर किती परिणाम होऊ शकतो, याविषयीचा एक अभ्यास नुकताच करण्यात आला आहे.
झीन्यूज यांनी दिलेल्या वृत्तानुसार जर्मनीमधील हेमहोल्ट्ज सेंटर फॉर एन्व्हार्नमेंट रिसर्च येथे याविषयीचा एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये ५ ते १२ वर्षे या वयोगटातील ५०० मुलांचा अभ्यास केला गेला. त्या मुलांना वेगवेगळ्या पातळीवरचे अनेक आवाज ऐकविण्यात आले.
आणि त्यांना त्याचवेळी वेगवेगळी कामं, अभ्यास करायला सांगितला गेला. त्यातून असं दिसून आलं की जी मुलं नेहमीच गाेंधळ किंवा कर्कश्श आवाज असणाऱ्या भागात आहेत, त्या मुलांची कामं, अभ्यास अर्धवट झालेला होता. कारण त्यांना तशी एकाग्रताच तिथे मिळाली नाही. तसेच ती मुलं अनेक गोष्टी करायला विसरली. म्हणजेच विसरभोळेपणाही त्यांच्यात वाढत गेला.
यातूनच अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला आहे की कायम मोठमोठाले आवाज ऐकल्याने डोक्यावर ताण निर्माण होतो. यामुळे एकाग्रता कमी होतेच पण मुलांमधला चिडचिडेपणाही वाढतो.
त्यांना लवकर मानसिक थकवा येतो. अशी मुलं अर्थातच अभ्यासात कमी पडतात. त्यामुळे मुलांचं मोठ्या आवाजात टीव्ही पाहणं, गाणी ऐकणं लवकरच कमी करण्याची गरज आहे, असं या अभ्यासावरून दिसून येतं.
मोठ्या आवाजात टीव्ही पाहणे, गाणी ऐकणे मुलांसाठी घातक, २ आजारांचा धोका, तज्ज्ञ सांगतात.....
|