बातम्या
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा कोल्हापूर दौरा...
By nisha patil - 1/3/2025 2:06:31 PM
Share This News:
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा कोल्हापूर दौरा...
महालक्ष्मीचे दर्शन आणि कालवा सल्लागार समितीची बैठक
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा प्रारंभ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनाने झाला. यावेळी आमदार अमल महाडिक त्यांच्यासोबत उपस्थित होते. विशेष म्हणजे, दर्शनावेळी प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याशीही त्यांची भेट झाली.
महालक्ष्मी दर्शनानंतर मंत्री विखे पाटील आणि आमदार अमल महाडिक जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी रवाना झाले. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी व्यवस्थापन, कालव्यांची देखभाल-दुरुस्ती आणि जलसंपदा प्रकल्पांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
कोल्हापूर दौऱ्यादरम्यान मंत्री विखे पाटील विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, स्थानिक नेत्यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा कोल्हापूर दौरा...
|