बातम्या
टाकळीवाडीत पाण्याची टाकी अखेर स्वच्छ – कावीळ रुग्णवाढीमुळे नागरिक चिंतेत
By nisha patil - 3/18/2025 5:46:46 PM
Share This News:
टाकळीवाडीत पाण्याची टाकी अखेर स्वच्छ – कावीळ रुग्णवाढीमुळे नागरिक चिंतेत
वीट भट्ट्यांमुळे दूषित पाणी? प्रशासनाकडून दखल अद्याप नाही!
टाकळीवाडी येथील कुमार विद्या मंदिर शाळेजवळील जुनी गाव पुरवठा पाण्याची टाकी अनेक वर्षांनंतर अखेर स्वच्छ करण्यात आली. मात्र, याआधी अनेक वर्षे ही टाकी न साफ केल्यामुळे दूषित पाणी पिण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती.
टाकीजवळ असलेल्या वीट भट्ट्यांमधील बगॅस, राख, दगडी कोळसा यासारखा कच्चा माल हवेद्वारे पाण्यात मिसळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, याच दूषित पाण्यामुळे गावात कावीळ रुग्णसंख्या वाढली असून एका तरुणाचा मृत्यू देखील झाला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वीट भट्ट्या तातडीने बंद करण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने 31 मार्चपर्यंतची मुदत दिल्याने नागरिक नाराज आहेत. महसूल व आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य पावले उचलावीत, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
टाकळीवाडीत पाण्याची टाकी अखेर स्वच्छ – कावीळ रुग्णवाढीमुळे नागरिक चिंतेत
|