बातम्या
निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपण याआधी पाहिले आहे.
By nisha patil - 8/24/2024 7:50:41 AM
Share This News:
१. सकाळी उठल्या उठल्या लगेच: १-२ ग्लास पाणी प्यावे
याने आपला मेंदू आणि शरीर स्लिप मोड मधुन ग्रीड मोड मध्ये येतात. आपले अंतर्गत अवयव शुद्ध आणि स्वच्छ होतात. आतड्यांवर दबाव येऊन पोट साफ व्हायला मदत होते.
२. जेवणाआधी ३० मिनिटे: १ ग्लास पाणी.
यांनी आपली पचनक्रिया सुधारते आणि कॅलरी इंटेक कंट्रोल मध्ये राहतो.
३. व्यायामाच्या आधी व नंतर १-१ ग्लास पाणी पिणे.
व्यायामाच्या आधी प्यालेले पाणी आपल्या शरीराला व्यायामासाठी वॉर्मअप सारखे तयार करते.
व्यायामानंतर प्यालेले पाणी आपल्याला डीहायड्रेशन पासून वाचवते.
हेवी व्यायाम केल्यावर किंवा गर्म्याच्या दिवसात जास्त पाणी प्यावे.
४. आंघोळीच्या आधी: १ ग्लास पाणी.
कोमट पाणी प्याल्याने आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि आपले ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होते.
५. झोपायच्या आधी: १ ग्लास पाणी प्यावे.
झोपण्याआधी जर आपण हायड्रेटेड असलो तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी होतात. कारण घट्ट रक्त हार्ट अटॅकचे मुख्य कारण आहे.
६. जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल: १ ग्लास पाणी.
पाणी आपल्या मेंदूला पावर अप करते. Noggin's Fluids ची पातळी वाढते आणि आपल्या cognitive functions मध्ये सुधारणा होते.
जेव्हा तुम्हाला एखादे प्रेसेंटेशन द्यायचे असेल त्याआधी १ ग्लास पाणी प्या.
जेव्हा झोप येत असेल आणि झोपणे शक्य नसेल तेव्हा पण एक ग्लास पाणी प्या.
निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे आपण याआधी पाहिले आहे.
|