बातम्या

सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात.....?

What are the benefits of eating a spoonful of ghee in the morning on an empty stomach

By nisha patil - 7/5/2024 7:19:12 AM
Share This News:

सध्या आरोग्याबाबत सोशल मीडियावरही खूप पोस्ट-व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक एक्सपर्ट किंवा आयुर्वेदिक डॉक्टरही आरोग्याची काळजी कशी घ्या याबाबत सांगत असतात. गेल्या काही दिवसात अनेकजण सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाण्याचा सल्ला देत आहेत. असं केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात असं सांगितलं जात आहे. पण याचे फायदे सगळ्याच लोकांना माहीत असतात असं नाही. 

तेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

इम्यूनिटी वाढते...
 तूपामध्ये ब्यूटिरिक अॅसिड भरपूर असतं जे शरीरातील वेगवेगळ्या आजारांसोबत लढण्याची शक्ती वाढतं. याच्या सेवनाने आजारांसोबत लढणाऱ्या पेशींची वाढ होते.

वजन कमी होतं...
 तूपाचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच वाढलेलं पोट कमी होण्यासही तूपाची मदत होते. कारण याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं ज्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते. सकाळी एक चमचा तूपाचं सेवन केल्याने भूकही कंट्रोल राहते. पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.

त्वचेलाही होतात फायदे...
 तूपाचं सेवन केल्याने त्वचेला भरपूर फायदे मिळात. या असलेल्या व्हिटॅमिन्समुळे त्वचा सैल होत नाही, सुरकुत्या पडत नाहीत. तसेच त्वचेवर तूप लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

पचनक्रिया चांगली राहते...
 तूपामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. याने पोट आणि पचन चांगलं राहतं. रोज सकाळी एक चमचा तूपाचं सेवन केल्याने पचन तंत्र मजबूत राहतं. पूर्वी लोक जेवणासोबत एक चमचा तूपाचं सेवन करत होते. याने पोट चांगलं राहत होतं आणि अल्सर व कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

हाडे होतात मजबूत...
 तूपाने हाडेही मजबूत होण्यास मदत मिळते. कारण यात भरपूर व्हिटॅमिन के असतं जे कॅल्शिअमचं अवशोषण वाढवण्यास मदत करतं. तसेच याने दातांना किडही लागत नाही.

सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात.....?