बातम्या

जेवणाचं ताट वाढलं की तुम्ही आधी काय खाता? पाहा रोजच्या जेवणात पदार्थांचा योग्य क्रम.....

What do you eat first when the dinner plate is big


By nisha patil - 5/16/2024 12:06:38 PM
Share This News:



आपण इंटरनेटवर असे अनेक पोस्ट पाहिल्या असतील, ज्यात आधी काय खावे ? लंच आणि डिनरची योग्य वेळ कोणती? जेवणाची योग्य वेळ कोणती? याबाबतची पोस्ट हमखास व्हायरल होतात (Health Care). भारतीय जेवणाच्या ताटात, चपाती, भाजी, डाळ आणि भात असतेच. 

पण जेवणाच्या ताटामधून आधी काय खावे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल...

अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'प्रथम भाज्या खाव्या, त्यानंतर प्रथिने आणि शेवटी कार्बोहायड्रेट खावे...
 या क्रमाने अन्न खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते. यामुळे थकवा आणि अशक्तपणाही कमी होते. विशेषत: ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना अशा प्रकारे खाण्याचा फायदा होतो

रिसर्च काय म्हणते...
न्यूयॉर्क टाइम्सच्या फूड ऑर्डरच्या रिपोर्टवर रिसर्च करणाऱ्या डॉ. अल्पना शुक्ला, यांनी २०१९ साली १५ लोकांवर प्रयोग केला होता. हे लोक प्री-डायबेटिक होते. या लोकांना तीन दिवशी प्रोटीनयुक्त आहार, सॅलड आणि सियाबट्टा ब्रेड वेगवेगळ्या ऑर्डरमध्ये खायला दिले. पहिल्या दिवशी प्रथम सियाबट्टा ब्रेड खायला देण्यात आले. १० मिनिटानंतर प्रोटीनयुक्त पदार्थ आणि सॅलड खायला देण्यात आले. दुस-या दिवशी आधी प्रोटीनयुक्त पदार्थ, आणि सॅलड, मग ब्रेड देण्यात आले. शेवटच्या दिवशी आधी सॅलड खायला सांगितके आणि नंतर प्रोटीनयुक्त पदार्थ मग ब्रेड खायला दिले. 

प्रथम प्रोटीन खाण्याचे फायदे...
या क्रमाने आहार दिल्यानंतर, जेवण करण्याच्या आणि जेवण केल्यानंतरच्या ३० मिनिटानंतर ब्लड सॅम्पल घेण्यात आले. तपासाअंती असे आढळून आले की, ब्रेड खाण्यापूर्वी प्रोटीन आणि सॅलड खाल्ले असता, रक्तातील साखरेचे प्रमाण आधी ब्रेड खाणाऱ्यांच्या तुलनेत ४६ टक्के कमी असल्याचे आढळून आले. जर आपण आधी फॅट्स, फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले तर, पोट अधिक काळ भरलेले राहते. भूक लवकर लागत नाही. पोट आधीच भरलेले असल्याने, या परिस्थितीत कार्बोहायड्रेट्सचे शोषण खूप कमी होते. त्यामुळे आपण या क्रमात जेवण करू शकता 


जेवणाचं ताट वाढलं की तुम्ही आधी काय खाता? पाहा रोजच्या जेवणात पदार्थांचा योग्य क्रम.....